Falguni Pathak Dandiya queen After Kinjal Dave show  
मनोरंजन

Kinjal Dave Dandiya Show : फाल्गुनीनंतर आता किंजल दवेच्या कार्यक्रमात भामट्यांनी केला कहर! केली मोठी फसवणूक

या प्रकरणानंतर किंजल दवेच्या दांडिया कार्यक्रमातील बनावट पास प्रकरण उजेडात आले आहे.

युगंधर ताजणे

Falguni Pathak Dandiya queen After Kinjal Dave show : प्रसिद्ध गायिका आणि सेलिब्रेटी फाल्गुनी पाठकच्या मुंबईतील बोरिवलीमधील कार्यक्रमादरम्यान फसवणूकीचा प्रकार समोर आला होता. त्यातून १५६ तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला होता. त्यानंतर आता सेलिब्रेटी किंजल दवेच्या दांडिया कार्यक्रमात फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.

दांडिया क्वीन म्हणून फाल्गुनीचे नाव घेतले जाते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ तिनं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. तिच्या नावाची क्रेझ केवळ भारतातच नाहीतर जगभरात सगळीकडे आहे. त्यामुळे जिथे फाल्गुनीच्या दांडिया कार्यक्रमाला होणारी गर्दी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून येते. अशातच तिच्या दांडिया कार्यक्रमाचे पास अव्वाच्या सव्वा दरात देऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

Also Read - Navratri 2023 : तलवारीचं 'स्त्री'त्त्व आणि आदिमायेच्या गुणतत्त्वांचा सहसंबंध काय आहे?

या प्रकरणानंतर किंजल दवेच्या दांडिया कार्यक्रमातील बनावट पास प्रकरण उजेडात आले आहे. त्या बनावट पासेसच्या विक्री प्रकरणी चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एमएचबी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आमदार सुनील राणे यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं रंगरात्री दांडिया नाईट्सच आयोजन करण्यात आले असून त्यात ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या फसवणूकीच्या प्रकरणातून 36 लाख रुपयांची मालमत्ता केली आहे. करण शाह , दर्शन गोहिल, परेश नेवरेकर आणि कविष पाटील अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी शाहिद कपूर आणि विजय सेतुपति यांची फर्जी नावाची मालिका प्रसिद्ध झाली होती. पाहून आपल्याला अशा प्रकारे फसवणूक करण्याची कल्पना सुचली. अशी बाब पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी या तपासातून १ हजार बनावट पासेस, १हजार होलोग्राम स्टिक, लॅपटॉप आणि प्रिंटर जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT