the family man season 2  Team esakal
मनोरंजन

'The Family Man 2'चा नवा विक्रम; 'फ्रेंड्स', 'गेम ऑफ थ्रोन्स'लाही टाकलं मागे

मनोज वाजपेयी आनंदाच्या शिखरावर

स्वाती वेमूल

'द फॅमिली मॅन २' The Family Man 2 ही बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. पहिल्या सिझननंतर दुसऱ्या सिझनची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. सोशल मीडियावरही या सिझनला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या वेब सीरिजने एक नवा विक्रम रचला आहे. जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या वेब सीरिजपैकी 'द फॅमिली मॅन २' ही सीरिज चौथ्या स्थानावर आहे. या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता मनोज वाजपेयी Manoj Bajpayee आणि दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. (Family Man is fourth on IMDbs list of most popular shows in the world)

सर्वाधिक लोकप्रिय शोच्या या यादीत पहिल्या स्थानावर 'लोकी', दुसऱ्या स्थानावर 'स्वीट टूथ' आणि तिसऱ्या स्थानावर 'मेअर ऑफ इस्टटाउन' आहे. विशेष म्हणजे मनोज वाजपेयीच्या या सीरिजने 'फ्रेंड्स', 'ब्रेकिंग बॅड' आणि 'गेम ऑफ थ्रोन्स' यांसारख्या प्रसिद्ध शोजनाही मागे टाकलंय. युजर्सच्या मतांच्या आधारावर IMDb शोजचा क्रमांक ठरवते. या सीरिजला IMDb वर १० पैकी ८.८ रेटिंग्स मिळाले आहेत. ही ग्लोबल रँकीग वेळोवेळी बदलत असते. मात्र टॉप १०० शोजच्या यादीत 'द फॅमिली मॅन २' वगळता दुसरा कुठलाही भारतीय टीव्ही शो दिसत नाहीये.

'द फॅमिली मॅन' या सीरिजचा तिसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिसऱ्या सिझनच्या कथानकावर सध्या काम सुरू आहे. दुसऱ्या सिझनमध्ये मनोज वाजपेयीसोबत प्रियामणी, समंथा अक्कीनेनी, शारीब हाश्मी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT