Famous actor Sayaji Shinde
Famous actor Sayaji Shinde esakal
मनोरंजन

हृदय रक्‍तवाहिनीत बिघाड; अभिनेते सयाजी शिंदे रुग्‍णालयात, शस्‍त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट

सकाळ डिजिटल टीम

दोन- तीन दिवसांपूर्वी चित्रीकरण रद्द झाल्‍याने सयाजी शिंदे हे साताऱ्यात आले होते. यानंतर त्‍यांनी हृदयाशी निगडित इतर चाचण्‍या आणि उपचार करण्‍याचे ठरवले.

सातारा : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांच्‍यावर साताऱ्यातील एका खासगी रुग्‍णालयात (Private Hospital) उपचार सुरू असून, हृदय रक्‍तवाहिनीतील अडथळा दूर करणारी शस्‍त्रक्रिया त्‍यांच्‍यावर करण्‍यात आली आहे. शस्‍त्रक्रियेनंतर त्‍यांची प्रकृती स्‍थिर असून, येत्‍या आठवडाभरात ते त्‍यांची दैनंदिन कामे पूर्ववत करण्‍यास सज्‍ज होतील, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉ. सोमनाथ साबळे यांनी प्रसारमाध्‍यमांना दिली.

गेल्‍या काही दिवसांपासून अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयक्रियेबाबत अस्‍वस्‍थता जाणवत होती. यामुळे त्‍यांनी त्‍याबाबतच्‍या वैद्यकीय तपासण्‍या (Medical Test) काही दिवसांपूर्वी करून घेतल्‍या होत्‍या. या तपासणी अहवालात थोडे वैद्यकीय बदल दिसून आले. यानंतर प्रगत तंत्रज्ञानाच्‍या मदतीने पुन्‍हा काही चाचण्‍या करून घेण्‍यात आल्‍या. या चाचणीत दोष आढळून आले. यानंतर त्‍यांनी आवश्‍‍यक ते उपचार घेण्‍याचा निर्णय घेतला.

दोन- तीन दिवसांपूर्वी चित्रीकरण रद्द झाल्‍याने सयाजी शिंदे हे साताऱ्यात आले होते. यानंतर त्‍यांनी हृदयाशी निगडित इतर चाचण्‍या आणि उपचार करण्‍याचे ठरवले. यानुसार ते साताऱ्यातील एका खासगी रुग्‍णालयात दाखल झाले. वैद्यकीय तपासणीत हृदयाच्या एका रक्‍तवाहिनीत अडथळा असल्‍याचे आढळले. यानुसार तत्काळ त्‍यावरील उपचार आणि शस्‍त्रक्रिया त्‍याच हॉस्‍पिटलमध्‍ये करण्‍यात आली.

याबाबत डॉ. सोमनाथ साबळे यांनी शस्‍त्रक्रियेनंतर सयाजी शिंदे यांची प्रकृती स्‍थिर असून, येत्‍या आठवडाभरात ते त्‍यांची दैनंदिन कामे पूर्ण क्षमतेने करतील, अशी माहिती प्रसारमाध्‍यमांना दिली. याच अनुषंगाने सयाजी शिंदे यांनी समाजमाध्‍यमांवर काळजी करण्‍याचे काहीही कारण नसल्‍याचे सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT