Irrfan khan spotted on airport
Irrfan khan spotted on airport  
मनोरंजन

एअरपोर्टवर व्हिलचेअरवर दिसला 'हा' अभिनेता ;चाहत्यांची वाढली चिंता

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये त्याचा आगामी चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' चं शुटिंग करत होता. लंडनमधील शुटिंग संपवून तो भारतात परतला आहे. मुंबई विमानतळावर त्याला पाहण्यात आले. मात्र इरफान व्हिलचेअर आपला चेहरा लपवताना दिसला. 

व्हिलचेअरवर इरफानला पाहून त्याचे चाहते चिंतीत आहेत. इरफान बराच काळ न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी सामना करत होता. त्यासाठी तो लंडनमध्ये उपचारदेखील घेत होता. काही महिन्यांपूर्वी तो भारतात परतला आणि 'हिंदी मीडियम' चा सीक्वल असलेला 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केली. मात्र व्हिलचेअरवर दिसलेला इरफान अजुनही पूर्णपणे बरा झालेला नाही असं वाटत आहे. इरफानदेखील त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिलचेअरवरील फोटो पाहिल्यानंतर त्याचे अनेक चाहते तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. 

या गंभीर आजारामुळेच इरफान मोठ्या पडद्यापासून बराच काळ दुरावलेला होता. 'कांरवा' या चित्रपटातून तो शेवटी दिसून आला. त्यानंतर आता 'अंग्रेजी मीडियम' मध्ये तो मुख्य भूमिका साकारणार आहे. इरफानसोबत या चित्रपटामध्ये राधिका मदान आणि करीना कपूर खान दिसणार आहेत. 'हिंदी मीडियम' हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT