tarak mehta leaving serial shailesh lodha
tarak mehta leaving serial shailesh lodha 
मनोरंजन

'तारक मेहता' च्या चाहत्यांना मोठा झटका; मुख्य अभिनेत्याचा मालिकेला रामराम?

प्रणाली मोरे

'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेनं गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांची काही कमी नाही. तुम्हीही जर मालिकेचे चाहते असाल तर ही बातमी ऐकून तुम्ही थोडं नाराज व्हाल. बातमी आहे की 'तारक मेहता..' मध्ये मुख्य भूमिका करणारे शैलेश लोढा(Sailesh Lodha) जवळ-जवळ १४ वर्षांनी ही मालिका सोडत आहेत. बातमी आहे की शैलेश लोढा यांनी मालिकेचं शूटिंग करणं थांबवलं आहे. दिशा वकानी म्हणजे दया बेन नंतर आता मालिकेचा कणा समजले जाणारे आणि तारक मेहता ही महत्त्वाची भूमिका बजावणारे शैलेश लोढा मालिकेतून एक्झिट घेणार असल्यानं आता प्रेक्षक नाराज झाल्याचा सूर उमटत आहे.

या मालिकेत शैलेश लोढा, 'जेठालाल' म्हणजेच दिलीप जोशी(Dilip Joshi)च्या बेस्ट फ्रेंडच्या भूमिकेत आहेत. याआधी राज अनदकट म्हणजेच 'टप्पू'चा मालिकेला रामराम' या बातमीची सुद्धा जोरदार चर्चा झाली होती. माहितीनुसार, शैलेश लोढा यांनी शूटिंग बंद केलं आहे,आणि मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. बोललं जात आहे की,तारकची भूमिका गेल्या एक महिन्यापासून शो मध्ये दाखवली गेली नाही.

या आधी शैलेश लोढा यांनी या मालिकेसाठी खूप चांगल्या ऑफर्सना नकार दिला आहे पण आता त्यांना संधी सोडायची नाही. तसंच अशीही बातमी कानावर येतेय की 'तारक मेहता..'च्या मेकर्समध्ये आणि शैलेश लोढा यांच्यात शूटिंगच्या तारखांवरुन देखील वाद सुरू आहेत. पण या वादानंतर शैलेश लोढा यांची समजूत काढण्यात तारक मेहता प्रॉडक्शनची टीम असफल राहिली आहे. आणि त्यामुळे ते मालिकेला सोडणार असल्याचं कळत आहे. पण या कारणानं त्यांचे चाहते मात्र दुखावलेयत एवढं नक्की. आणि असंही कळत आहे की शैलेश लोढा यांना एक चांगली ऑफर मिळाली आहे म्हणूनच मालिका सोडण्याचा त्यांचा निर्णय पक्क केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT