Famous poet and painter Imroz passes away Esakal
मनोरंजन

Imroz Dies: प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन!

प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन झाले आहे.

Vaishali Patil

Imroz dies at 97: साहित्या क्षेत्रातून एक वाईट बामती समोर आली आहे. आज प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन झाले आहे.

त्यांनी वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांच्या मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होते.

इमरोज यांचे मूळ नाव इंद्रजित सिंग होते. अमृता प्रीतमसोबतच्या नात्यानंतर इमरोज लोकप्रिय झाले. दोघांनी लग्न केले नसले तरी ते 40 वर्षे एकमेकांसोबत राहिले.

इमरोज यांच्या मृत्यूला त्याचे जवळचे मित्र अमिया कुंवर यांनी दुजोरा दिला.

अमिया म्हणाले, "इमरोजला काही दिवसांपासून तब्येतीचा त्रास होत होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो पाईपमधून अन्न खात होता, पण तो अमृताला एक दिवसही विसरू शकला नाही. तो म्हणाला, 'अमृता आली आहे, ती आहे. इथेच'. इमरोज आज भलेही जग सोडून गेला असला, पण तो फक्त अमृतासोबत स्वर्गात गेला आहे.'

इमरोज यांचा जन्म 1926 मध्ये लाहोरपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात झाला. इमरोज यांनी जगजीत सिंग यांच्या 'बिरहा दा सुलतान' आणि बीबी नूरनच्या 'कुली रह विचार'सह अनेक प्रसिद्ध एलपीचे पहिले पान डिझाइन केले होते.

इमरोज आणि अमृता यांची प्रेमकहानी खुप प्रसिद्ध आहे. अमृता आणि इमरोज यांच्या वयात सात वर्षांचा फरक होता. 2005 मध्ये अमृताचे निधन झाले. मृत्यूपूर्वी अमृताने इमरोजसाठी 'मैं तुम्हें फिर मिलूंगी' अशी कविता लिहिली होती.

इमरोज तिच्या मृत्यूनंतर कवी बनला. त्यांनी अमृताची प्रेमकविता पूर्ण केली होती. त्याचे नाव होते 'उसने जिस्म छोड़ा है, साथ नहीं'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT