diljaan 
मनोरंजन

प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू; दोन दिवसांत येणारं होतं नवीन गाणं

स्वाती वेमूल

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी पहाटे ३.४५ वाजता ही दुर्घटना घडली असून दिलजानचा जागीच मृत्यू झाल्याचं कळतंय. या वृत्ताने मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमृतसरहून करतापूरला जाताना जंडियाला गुरूजवळ हा अपघात झाला आणि अपघातात दिलजानने जागीच प्राण सोडले. दिलजान हा करतापूरचा राहणारा होता. त्याची गाडी रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने हा भीषण अपघात असल्याचं समजतंय.  

दिलजानची कार अमृतसर-जालंधर जीटी रोडवर जंडियाला गुरू पूलजवळ रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर दिलजानचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दिलजानची कार दुभाजकाला धडकली कशी आणि यात नेमकी चूक कोणाची याचा तपास पोलीस करत आहेत. मंगळवारी पहाटे दिलजान अमृतसरहून करतापूरला जात होता. यावेळी त्याच्या गाडीचा वेग जास्त असून ती नियंत्रणाबाहेर गेली आणि दुभाजकाला धडकली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

२ एप्रिल रोजी नवीन गाणं होणार होतं प्रदर्शित
येत्या २ एप्रिल रोजी दिलजानचं नवीन गाणं चाहत्यांच्या भेटीला येणार होतं. याच कामानिमित्त तो सोमवारी आपल्या कारने अमृतसरला गेला होता. तिथूनच परत येताना ही दुर्घटना घडली. अपघातावेळी कारमध्ये दिलजान एकटाच होता. दिलजानच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. दिलजानने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट पंजाबी गाणी गायली आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Insurance: PF खातेदारांना मिळतो तब्बल 7 लाखांचा मोफत विमा; अनेकांना याची माहितीच नाही; जाणून घ्या पात्रता आणि नियम

5-4-5 Walking Pattern: फक्त 15 मिनिटं चालल्याने झटक्यात कॅलरीज बर्न होतात? काय आहे ही '5-4-5 वॉकिंग पॅटर्न' जो सगळ्यांनाच आवडतोय

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

UP: अखिलेश यादव यांच्या लेकीवरील 'त्या' कमेंट्सवर CM योगी आक्रमक! म्हणाले, "मुलगी कोणाचीही असो, तिचा अपमान खपवून घेणार नाही!"

E-commerce impact on farmers: शेतातून थेट ग्राहकांपर्यंत, ई-कॉमर्स ऑपरेशन्स नेटवर्क शेतकऱ्यांसाठी ठरतंय वरदान

SCROLL FOR NEXT