Shahrukh Khan Sakal
मनोरंजन

Pathaan: 'पठाण'साठी हनीमून कॅन्सल... शाहरुखचं चाहत्याला भन्नाट उत्तर

पठाण हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी शाहरुख खानने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला.

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान अनेकदा आस्क एसआरके सेशनद्वारे त्याच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. पठाण हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी शाहरुख खानने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. यादरम्यान तो पुन्हा एकदा आपल्या फनी स्टाइलमध्ये दिसला. चाहत्यांच्या प्रश्नांना त्यांनी मजेशीर उत्तरे दिली. इतकंच नाही तर अनेक चाहत्यांच्या वाकड्या तिकड्या प्रश्नांना त्याने मजेदार उत्तरंही दिले.

एका चाहत्याने शाहरुख खानला विचारले की, "मी पठाणचा लेट नाईट शो बुक केला आहे. पण आता रात्री उशिरा घरी जाण्याची परवानगी मिळेल की नाही याची भीती आहे". याला उत्तर देताना शाहरुखने सल्ला दिला की, "तुम्ही रात्री घराबाहेर झोपा आणि सकाळी मॉर्निंग वॉकला आल्यासारखे अ‍ॅक्टिंग करा, कशी वाटली आयडिया?"

एका चाहत्याने ट्विट करून विचारले, “सर, माझे गेल्या आठवड्यात लग्न झाले आहे, मी आधी हनिमूनला जाऊ की पठाण बघू?” याच्या उत्तरात शाहरुखने लिहिले, “बेटा, एक आठवडा झाला, अजून हनिमून केला नाही, आधी पठाण बघ आणि मग बायकोसोबत हनिमूनला जा ".

शाहरुख खाननेही या सेशनच्या शेवटी चाहत्यांचे प्रेम आणि समर्थनाबद्दल आभार मानले. त्याने ट्विट केले की, “आता जायचे आहे कारण मला मी कुटुंबासोबत जेवण करायचे आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, चित्रपटादरम्यान भेटू".

शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमा २५ जानेवारी २०२३ रोजी रिलीज होत आहे. या सिनेमात दीपिका पदूकोण,जॉन अब्राहम,डिंपल कपाडिया,आशुतोष राणा सोबत अेनक स्टार्स असणार आहेत. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. यश राज फिल्म्सच्या प्रॉडक्शन अंतर्गत हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : पाणी भरण्याच्या वादावरून महिलेने केली शेजाऱ्याची हत्या

SCROLL FOR NEXT