Suriya Sivakumar, Suriya Sivakumar news, Suriya Sivakumar fan  SAKAL
मनोरंजन

Suriya Sivakumar: मॉलमध्ये गोळी लागून झाला फॅनचा मृत्यू, सूर्याला जबर धक्का, भावुक होत म्हणाला...

सूर्याच्या फॅनचा असाच एक भावुक करणारा किस्सा समोर आलाय.

Devendra Jadhav

Suriya Sivakumar News: साऊथचा सुपरस्टार सुर्याने त्याच्या चित्रपट आणि त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वत्र ओळख निर्माण केली आहे. आज भारतात नव्हे तर जगभरात सूर्याचे लाखो चाहते आहेत.

सूर्या त्याच्या फॅनमध्ये सुद्धा लोकप्रिय आहे. सूर्याने फॅनला केलेली मदत जगजाहीर आहे. सूर्या अनेकदा त्याच्या फॅन्सना गरजेच्या वेळी मदत करतो. सूर्याच्या फॅनचा असाच एक भावुक करणारा किस्सा समोर आलाय.

(Fan dies in mall shooting, Suriya Sivakumar shocked, emotional post)

झालं असं की.. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील टेक्सासमधील एका मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात सूर्याच्या एका चाहत्याचा मृत्यू झाला होता.

जेव्हा अभिनेत्याला हे समजले तेव्हा त्याने खास श्रद्धांजली दिली आहे. सूर्या प्रचंड भावुक झालेला दिसला. सूर्याच्या या चाहत्याचे नाव ऐश्वर्या थाटीकोंडा असून ती 27 वर्षांची होती.

6 मे रोजी ती तिच्या मैत्रिणीसोबत टेक्सासमधील एका मॉलमध्ये खरेदी करत असताना गोळीबारात तिला आपला जीव गमवावा लागला.

ऐश्वर्या सूर्याची खूप मोठी चाहती होती आणि ती अभिनेत्याच्या कामाचे खूप कौतुक करत असे. दुसरीकडे जेव्हा सूर्याला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने एक भावनिक चिठ्ठी लिहून ऐश्वर्याच्या कुटुंबीयांना पाठवली.

सुर्याने आपल्या चिठ्ठीत कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आणि म्हटले की, टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात आपली मुलगी ऐश्वर्या हिला गमावणे खूप दुःखद आणि धक्कादायक आहे. जेव्हा मी माझ्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला शब्द सापडत नाहीत.

ऐश्वर्यासाठी सूर्या म्हणाला, “ऐश्वर्या तूच खरी हिरो आहेस. तू तुझ्या कुटुंबाची आणि मित्रांची स्टार आहेस.

तुझ्या आतली ऊर्जा तुझ्या चित्रात प्रतिबिंबित होते आणि तुझे हास्य हे सांगते की तुझ्यात खूप चांगला उत्साह होता." सूर्याने त्याची फॅन ऐश्वर्यासाठी लिहिलेली ही भावुक चिठ्ठी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सूर्याने आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत. 2021 साली प्रदर्शित झालेल्या जय भीम या चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला होता.

त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपट 'कंगुवा'साठी शूटिंग करत आहे. या चित्रपटात तो डबल रोल करणार असून असून त्याच्यासोबत दिशा पटनी दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Highway: दारूच्या नशेत दुचाकीवरून प्रवासाचा हट्ट; मंचर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टाळला अनर्थ, प्रसंगावधानामुळे आई-मुलांची सुखरूप भेट..

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात औषध विक्रेत्यांचा मूक मोर्चा; ऑनलाईन औषध विक्रीविरोधात तीव्र आंदोलन

ती गोष्ट घडली अन् करिष्मा कपूर थेट शिव्या द्यायला लागली... सरोज खान इतक्या संतापल्या की... नेमकं काय घडलेलं?

सागाची झाडं तोडण्यासाठी घेतली लाच; खासगी चालक, डेटा ऑपरेटर, वनमजूर, वनरक्षक, लिपिक ते वनपाल अशा ८ जणांना अटक

MP Tourism: फक्त एका महिन्यासाठी सरकारकडून विशेष सूट! 'या' ९ निसर्गरम्य गावांना आजच द्या भेट; वाचा संपूर्ण प्लॅनिंग

SCROLL FOR NEXT