Umesh Kamat Sakal
मनोरंजन

चाहत्यांची दाद मोलाची : उमेश कामत

फॅन मोमेंट’ ही प्रत्येक कलाकारासाठी खासच असते.

सकाळ वृत्तसेवा

‘फॅन मोमेंट’ ही प्रत्येक कलाकारासाठी (celebrity) खासच असते. अनेक चाहते (Fans) आपल्या आवडत्या कलाकाराला (celebrity) भेटून अनुभव शेअर (Share) करत असतात. काही मजेशीर असतात, काही भावनिक (Emotional)असतात, काही चाहत्यांच्या (Fans) आयुष्याशी मिळतेजुळतेही (Similarly)असतात. ‘आणि काय हवं ३ प्रदर्शित (Release) झाली आणि असाच काहीसा अनुभव (Experience) आपल्या उमेश कामतलाही (Umesh Kamat)आला.

एका एपिसोडमध्ये जुई आणि साकेत हे साडी खरेदीला जातात. तिथे जुई वेगवेगळ्या दुकानांमध्ये जाते आणि साकेत दुकानात न जाण्याची वेगवेगळी कारणे शोधत असतो. या वेळी होणारी धमाल यात दाखवण्यात आली आहे. ही अनेक पुरुषांची व्यथा आहे. बायको खरेदीला जाते आणि नवरा तासन् तास तिची वाट बघत बसतो. एका चाहत्याने उमेशला भेटून त्याचाही हुबेहूब तसाच अनुभव असल्याचे सांगितले. आमच्याही घरात अशीच खरेदी असते आणि त्या वेळी मीही अशीच कारणे देत असतो. उमेशलाही हा किस्सा खूपच मजेशीर वाटला.

खरेदीबाबत आणि ‘फॅन मोमेंट’ बाबत उमेश कामत म्हणतो, ‘‘चाहत्यांकडून मिळणारी दाद ही आमच्यासाठी खूपच मोलाची असते. ज्या वेळी चाहते आम्हाला खास भेटून, सोशल मीडियावर मेसेज करून त्यांचे अनुभव आमच्याशी शेअर करतात, त्या वेळी आपण त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचतोय याचा आनंद होतो. साडीचा किस्सा हा जरी मजेशीर असला, तरी काही अनुभव असेही आले आहेत, जे मनाला स्पर्शून जाणारे आहेत. एक सात वर्षांची चाहती ‘आणि काय हवं ३’ पाहताना खदखदून हसते, तेव्हा आयुष्यात आणि काय हवं? आपल्या कलाकृतीमुळे एखाद्याचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरू होणे, हे खरेच मनाला खूप समाधान देणारे आहे.’’

‘‘लॉकडाऊनच्या काळात एका जोडप्याचे भांडण इतक्या टोकाला गेले होते, की त्यांचा घटस्फोट होणार होता. नुकतेच त्यांनी ‘आणि काय हवं ३’ पाहिला आणि त्यांनी त्यांच्या नात्याला पुन्हा एकदा संधी देण्याचे ठरवले. यापेक्षा मोठी कोणती गोष्ट असू शकते. खरेदीबाबत सांगायचे तर प्रिया जुईसारखी अजिबात नाही. कारण प्रिया खरेदीला खूप वेळ लावत नाही. एक वेळ मला वेळ लागेल, पण प्रियाची खरेदी पटकन होते. मुळात माझी खरेदीही बऱ्याचदा प्रियाच करते,’’ असा अनुभवही उमेशने शेअर केला... एमएक्स प्लेअर आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशन निर्मित ‘आणि काय हवं’च्या तिसऱ्या सिझनचे सहा भाग असून ते प्रेक्षकांना एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT