rajeshwari kharat
rajeshwari kharat 
मनोरंजन

'फँड्री'तल्या शालूचं मेकओव्हर; तुम्ही आर्चीलाही विसराल!

स्वाती वेमूल

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' हा चित्रपट माहीत नाही, असा क्वचितच कोणी तरी असेल. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकच नाही तर समिक्षकांचंही मन जिंकलं होतं. जब्या आणि शालू यांची जोडी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. यामध्ये सोमनाथ अवघडे याने जब्याची तर राजेश्वरी खरातने शालूची भूमिका साकारली होती. चित्रपटात अत्यंत सोज्वळ शालूची भूमिका साकारणाऱ्या राजेश्वरीचा आता झालेला मेकओव्हर पाहून तुम्हीही थक्क व्हाल! 

राजेश्वरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राजेश्वरीचे हे फोटो पाहिल्यावर तिच्यासमोर 'सैराट'मधील आर्चीसुद्धा फिकी पडेल, अशी भावना तुमच्या मनात येईल. राजेश्वरी आता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पारंपरिक लूक असो किंवा मग वेस्टर्न, प्रत्येक लूकमधील राजेश्वरीच्या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडतो. 

'फँड्री'नंतर राजेश्वरीने अॅटमगिरी या चित्रपटात भूमिका साकारली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना राजेश्वरीने 'फँड्री'मध्ये अत्यंत सहज अभिनय केला होता. ती मूळची पुण्याची असून तिचे वडील बँकेत नोकरी करतात. राजेश्वरीला एक बहीण व भाऊ आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT