'The Family Man-2' ESAKAL
मनोरंजन

'द फॅमिली मॅन २'मध्ये आसिफ यांना पाहून चाहते भावूक; सहा महिन्यांपूर्वी केली होती आत्महत्या

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आसिफ यांनी केली होती आत्महत्या

प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार मनोज वाजपेयीच्या Manoj Bajpayee 'द फॅमिली मॅन २' The Family Man 2 या नव्या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. आता दुसऱ्या सिझनचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी, समंथा अक्किनेनी Samantha Akkineni आणि प्र‍ियामणी Priyamani हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या कलाकारांसोबतच सोशल मीडियावर अभिनेते आसिफ बसरा यांची चर्चा आहे. सीरिजच्या ट्रेलरमध्ये त्यांना पाहून प्रेक्षक भावूक झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी आस‍िफ Asif Basra) यांनी आत्महत्या केली होती. (Fans Express Their Feelings After Seeing Asif Basra In The Family Man 2 Trailer)

जब वी मेट, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई आणि काय पो छे या सुपर हिट चित्रपटांमधून आस‍िफ बसरा हे प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. आसिफ यांनी आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली होती. सात नोव्हेंबर २०२० रोजी आसिफ यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आसिफ यांनी नैराश्यातून हे पाऊल उचललं, असा अंदाज व्यक्त केला जात होता. आत्महत्येपूर्वी त्यांनी 'द फॅमिली मॅन २'चं शूटिंग पूर्ण केलं होतं. आता त्यांच्या निधनानंतर ट्रेलरमध्ये त्यांना पाहून चाहते भावूक झाले आहेत.

आस‍िफ हे 'द फॅमिली मॅन २' या सीरिजमध्ये मानसोपचार तज्ज्ञांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही वेब सीरिज 4 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Bill: विमा क्षेत्रात मोठी झेप! ‘सबका बिमा सबकी रक्षा’ विधेयक मंजूर; नव्या कायद्याचे परिणाम काय?

Tourist Bus Accident : पर्यटकांची मिनी बस चढावरून अचानक जाऊ लागली मागे; तरूणींनी जीव वाचवण्यासाठी मारल्या उड्या!

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

IND vs SA, T20I: भारत-दक्षिण आफ्रिका संघातील लखनौत होणारा चौथा सामना रद्द; कारण घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं

SCROLL FOR NEXT