Bigg Boss 16 : फराह - साजिदच्या डोक्यावर नव्हतं छप्पर, तेव्हा जुहू चौपाटीवर दोघे..  SAKAL
मनोरंजन

Bigg Boss 16 : फराह-साजिदच्या डोक्यावर जेव्हा छप्पर नव्हतं, तेव्हा जुहू चौपाटीवर दोघे..

बिग बॉस १६ मध्ये फराह खानने एंट्री केलीय. फराह खानने नुकतंच बिग बॉसच्या घरात वाढदिवस साजरा केला.

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस १६ मध्ये फराह खानने एंट्री केलीय. फराह खानने नुकतंच बिग बॉसच्या घरात वाढदिवस साजरा केला. फराह बिग बॉस मधील इतर स्पर्धकांसोबत वेळ घालवत असते. त्यावेळी तिने साजिद आणि तिचा स्ट्रगलचा काळ सांगितला. फराह आणि साजिद सध्या जरी लोकप्रिय असले तरीही दोघांचं बालपण अत्यंत दुःखात गेलंय. बिग बॉस १६ च्या एका एपिसोड मध्ये फराहने अत्यंत वेदनादायी कहाणी सांगितली.

(farah khan and sajid khan had dance in juhu chowpaty during their struggle days)

फराह आणि साजिदचे वडील कामरान खान हे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. सगळं सुरळीत असताना त्यांचा एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यानंतर कामरान यांच्या आयुष्याने एक गंभीर वळण घेतले. सिनेमातील आपली सर्व बचत गमावल्यानंतर, त्यांनी स्वतःला दारुच्या व्यसनात बुडवून घेतल. याचा गंभीर परिणाम कामरान यांच्या आयुष्यावर झाला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

परिस्थीती इतकी बेकार कि तेव्हा फराहच्या कुटुंबाकडे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते. फक्त ३० रुपये शिल्लक होते. अशावेळी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी फराहच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली. या पैशातून त्यांनी सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार तर पार पाडलेच, याशिवाय काही दिवसांसाठी खायचे सामान विकत घेतले.

साजिद खान बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये म्हणाला कि,"तो आणि फराह जुहू बीचवर नाचायला जायचे. नाचल्यावर लोकं जे काय थोडेफार पैसे देतील त्यातून ते पैसे कमवायचे." अशाप्रकारे या बहीण - भावाने आयुष्यात असाही एक वाईट काळ बघितला आहे. साजिद खान बिग बॉस १६ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहे. सध्या बिग बॉस १६ च्या घरात फॅमिली वीक सुरु असून फराह खान लाडक्या भावाला सपोर्ट करायला घरात दाखल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT