Farah Khan,Shilpa Shetty held a pyjama party to celebrate tabu birthday
Farah Khan,Shilpa Shetty held a pyjama party to celebrate tabu birthday Instagram
मनोरंजन

Tabbu: तब्बूच्या पजामा पार्टीची सोशल मीडियावर चर्चा, फराह-शिल्पानं फोटो शेअर करत उडवून दिली धमाल

प्रणाली मोरे

Tabbu Birthday Photo: तब्बू,शिल्पा शेट्टी आणि फराह खान यांनी पजामा पार्टीचं आयोजन केलं होतं आणि या पार्टीत तब्बूचा बर्थ डे देखील साजरा करण्यात आला. शिल्पा शेट्टी आणि फराह खानने या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पार्टीत त्यांनी कशी धम्माल केली यासंदर्भात आपल्या चाहत्यांना फोटोच्या माध्यमातून झलक दाखवली आहे. (Farah Khan,Shilpa Shetty held a pyjama party to celebrate tabu birthday)

तब्बूने ४ नोव्हेंबरला आपला ५२ वा वाढदिवस साजरा केला. तिनं आपल्या बेस्ट फ्रेंड्स फराह खान आणि शिल्पा शेट्टी सोबत हा खास दिवस साजरा केला,ज्याचे फोटो आता समोर आले आहेत. तब्बूच्या या बर्थ डे पार्टीला स्पेशल बनवण्यासाठी शिल्पा आणि फराहने या पार्टीला पजामा पार्टीत बदलून टाकलं. याचे फोटोदेखील शेअर करण्यात आले आहेत.

फराह खानने इन्स्टाग्रामवर पार्टीचे फोटो शेअर करत सांगितलं की शिल्पाने तब्बूचा बर्थ डे आपलं हॉटेल बॅस्टियनमध्ये प्लॅन केला होता,पण शेवटी फराहच्याच घरी पजामा पार्टीचं आयोजन करत तब्बूच्या वाढदिवसाला खास पद्धतीनं सेलिब्रेट करण्यात आलं. या सेलिब्रेशन निमित्तानं तिघींनी नाइट वेअर परिधान केला होता. जिथे केकही कापण्यात आला आणि चविष्ट डिनरचेही आयोजन केले होते. फराह खानने पजामा पार्टीतला आपला फोटो शेअर करत लिहिलं आहे की,'' तब्बूचा वाढदिवस फॉर्मल ड्रेसध्ये सेलिब्रेट केला, शिल्पा बॅस्टियनचा प्लॅन आखण्यासाठी आणि मग माझ्याघरी सेलिब्रेशन प्लॅन बनवण्यासाठी आभारी आहे''.

Farah Khan,Shilpa Shetty held a pyjama party to celebrate tabu birthday

शिल्पाने देखील फराहच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. आणि म्हटलं आहे की,''फराह,तब्बू आणि बॅस्टियन...वचन पाळलं जाईल कारण पुढची पार्टी तुझीच आहे फराह,हॅप्पी बर्थ डे टिम्पू ..''

शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये खूप सारे पजामा पार्टीतले फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये जेवणाच्या टेबलाची चविष्ट झलक दाखवताना,केक कापतानाचे आणि नाइट ड्रेसमध्ये मस्ती करतानाचे फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रकाश आंबेडकर अन् ओवेसींनी बिघडवला मविआचा खेळ? नाहीतर BJP ला मिळाल्या असत्या फक्त 11 जागा! मतांचे गणित समजून घ्या...

Ishq Vishk Rebound: 30 वर्षापूर्वीच्या 'गोर गोर मुखडे पे' गाण्याचा रिमेक; इश्क विश्क रिबाउंड'मधील गाण्याची सर्वत्र चर्चा

NEET Exam Row : सर्वोच्च न्यायालयाने एनटीए तसेच याचिकाकर्त्यांना नोटीस; सर्व याचिकांवर 8 जुलै रोजी होणार एकत्रित सुनावणी

Shilpa Shetty & Raj Kundra : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात ; सोने गुंतवणूक योजनेत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल

IND vs CAN Pitch Report : न्यूयॉर्कच्या खेळपट्टीचं भूत मानगुटीवरून उतरलं आता फ्लोरिडाचं आव्हान; पिच देणार का फलंदाजांना दिलासा

SCROLL FOR NEXT