Farah Khan
Farah Khan Google
मनोरंजन

फराह खान स्वतःला समजू लागलीय ऐश्वर्या राय...

प्रणाली मोरे

फराह खान(Farah Khan)आपल्या सिनेमांमुळे कमी पण सोशल मीडियावरील तिच्या एखाद्या पोस्टमुळे किंवा मग टि.व्ही वरील एखाद्या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कधी परिक्षक म्हणून हजेरी लावून केलेल्या कमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ती करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील गाण्याचे नृत्यदिग्दर्शन करत होती. तेव्हा देखील तिनं आपला मित्र आणि दिग्दर्शक-निर्माता असलेल्या करणसोबतचे फनी व्हिडीओ रील सोशल मीडियावर पोस्ट केले होते. एरव्ही देखील ती आपल्या मुलांसोबतचे किंवा मग कुणा सेलिब्रिटीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काहीतरी फनी पोस्ट करून चर्चेत रहायचा प्रयत्न करीतच असते. पण आता हद्द झाली म्हणायची फराहची.

नुकताच तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. ज्यात तीनं केसांना हायलाइट्स केले आहेत. पण व्हिडीओत ती ज्यापद्धतीनं तिचे केस स्टाईलमध्ये उडवतेय त्यावरनं तरी बाई पन्नाशीतून थेट वीशीत गेल्याचाच भास होतोय. इतकंच काय तर थेट ऐश्वर्या रायच्या 'जोश' सिनेमातल्या 'हाय रे मेरा दिल,चुरा के ले गया' या गाण्यावर फराहनं ताल धरलेला पहायला मिळतोय. खरी गंम्मत तर तिच्या कॅप्शनमध्ये पहायला मिळतेय. तिचं म्हणणं आहे या नवीन केसांच्या लुकमुळे माझा जाडजुड चेहरा आणि 'डबल चीन' मी लपवू शकतेय. तिनं समस्त महिला वर्गाला ही ट्रीक आजमवायला सांगितली आहे. तसं करून बघायला काय हरकत आहे,नाही का? म्हणजे हायलाइट्स करा अन् फराहसारखे केस स्टाईलमध्ये उडवत चाला. रस्त्यावरून चालताना असं खुळ्यासाऱखं केल्यावर लोकांनी वेडं नाही ठरवलं तर मिळवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT