Farhan Akhtar, Shibani Dandekar Marriage First Photo Google
मनोरंजन

फरहान-शिबानीचं अनोखं लग्न;वर-वधूची पहिली झलक,सोहळ्याची क्षणचित्र पहा

खंडाळा येथील जावेद अख्तर यांच्या फार्महाऊसवर काही मोजक्याच सेलिब्रिटी-नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं.

प्रणाली मोरे

फरहान अख्तर(Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर(Shibani Dandekar) यांचं अखेर आज खंडाळा य़ेथील अभिनेत्याच्या फार्म हाऊसवर लग्न पार पडतंय. या लग्नाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत. खरं तर दोन दिवसांआधी बोललं जात होतं की हे दोघे महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्न करणार आहेत. पण लग्नाचा पहिला फोटो समोर आल्यानंतर सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

खंडाळा येथील जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या 'सुकून' या फार्महाऊसवर एका अनोख्या पद्धतीत हे लग्ना पार पडलं आहे. लग्नात फरहाननं काळ्या रंगाचा सूट घातला होता तर शिबानीन लाल रंगाचा गाऊन घातला होता. या लग्नात दोघांनी एकमेकांसाठी लिहिलेली वचनं माईकवर सर्वांसमोर जाहिरपणे बोलून दाखवली. या लग्नात ना सप्तपदीचे सूर आळवले गेले ना,कबलू है म्हटलं गेलं. तर फरहान-शिबानी यांनी स्वतः एकमेकांसाठी लिहिलेली काही वचनं सर्वांसमोर बोलून दाखवली. या लग्नाला शिबानीची बहिण अनुषा दांडेकर,मैत्रिण रिया चक्रवर्ती,फरहानची बहिण झोया अख्तर,हृतिक रोशन,राकेश रोशन,आशुतोष गोवारिकर,त्यांची पत्नी आणि इतर जवळील नातेवाईक तसंच मित्रपरिवार उपस्थिती राहिले होते.

या लग्नानंतर पार पडलेल्या पार्टीत शंकर महादेवन यांनी 'दिल चाहता है' गाणं म्हटलं. तर हृतिकनंही निर्माती-दिग्दर्शिका फरहा सोबत या गाण्यावर ताल धरला. या लग्नसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले अन् फरहान-शिबानीच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT