Don 3 Announcement: Esakal
मनोरंजन

Don 3 Announcement: शाहरुख खान की रणवीर सिंग? 'डॉन 3' ची घोषणा करत टिझर रिलिज...

फरहान अख्तरने डॉन 3 चित्रपटाची घोषणा केली आहे.

Vaishali Patil

Don 3 Announcement: ‘डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन डॉन को पकडना मुश्किल ही नहीं नामुमकिन है…’ क्वचितच लोक असतील की ज्यांनी हा डॉयलॉग ऐकला नसले. 'डॉन' आणि 'डॉन 2' चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. शाहरुख खानच्या करिअरमधील हे सुपरहिट सिनेमे होते.

शाहरुखच्या या चित्रपटातील भुमिकेने त्याच्या अभिनय कारकिर्दीला वेगळ्याच उंचीवर नेलं. गेल्या काही दिवसांपासून 'डॉन 3' ची चर्चा सुरु होती. लवकरच 'डॉन 3' प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशा प्रेक्षकांना होती. आता 'डॉन' फ्रँचायझीच्या निर्मात्यांनी एक टीझर रिलीज करत 'डॉन 3'ची अधिकृत घोषणा केली आहे.

फरहान अख्तरने आता डॉन 3 ची घोषणा केली आहे. डॉन 3 सोबत एक नवं पर्व घेऊन येत असल्याचं फरहाननं म्हटलं आहे. फरहान अख्तर त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याने डॉन 3 बद्दल सांगितले आहे.

मात्र चित्रपटच्या स्टारकास्टबद्दल फरहानने काहीही सांगितले नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चा सुरु आहेत की यावेळी रणवीर सिंग हा शाहरुख खानची जागा घेणार आहे. 'डॉन 3' मध्ये यावेळी रणवीर सिंग हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र शाहरुखच्या चाहत्यांना हे मुळिच मान्य नाही.

सोशल मीडियावर व्हिडिओ येताच 'डॉन 3' ट्रेंडिंगला आला आहे. 'डॉन 3'चा अधिकृत टीझर लवकरच प्रदर्शित होणार असल्याचंही सांगिकलं जात आहे. त्याचबरोबर 'गदर 2' च्या चित्रपटासोबत 'डॉन 3' चा टीझर रिलीज होणार आहे. अशा चर्चा सुरु आहे.

2006 मध्ये शाहरुख खान स्टारर 'डॉन' रिलीज झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. तर पाच वर्षांनंतर 2011 मध्ये 'डॉन 2' रिलीज झाला, ज्यामध्ये प्रियांका आणि लारा दत्ता देखील मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT