Farhan Akhtar on casting Ranveer in 'Don 3': Esakal
मनोरंजन

Farhan Akhtar On Ranveer: डॉन 3 मध्ये शाहरुखला सोडून रणवीरला का घेतलं? अखेर फरहाननं अखेर कारण सांगून टाकलं

Vaishali Patil

Farhan Akhtar on casting Ranveer in 'Don 3': गेल्या काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये डॉन चित्रपटाची चर्चा आहे. दिग्दर्शक फरहान अख्तरने 'डॉन 3' चा टिझर देखील शेयर केला होता. ज्यात शाहरुख खान नाही तर रणवीर सिंग डॉन बनणार असल्याची घोषणा त्याने केली. मात्र रणवीर सिंगला डॉनच्या भुमिकेत पाहणं अनेकांना खटकलं आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी नाराज देखील झाले. त्यांनी रणवीर सिंगला ट्रोल देखील केले. रणवीर सिंगचा डॉन3 मधील फर्स्ट लूक समोर आल्यानंतर निर्मात्यांना देखील चित्रपटाच्या कास्टिंगवरून खूप ट्रोल केलं होते आता फरहान अख्तरने अखेर या सर्व प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.

फरहान अख्तरने नुकत्याच एका मुलाखतीत रणवीरला कास्ट करण्याबाबत आणि चित्रपटाबाबत अनेक खुलासेही केले आहेत.

फरहान अख्तर म्हणाला की, ' मी खरोखर या गोष्टीला पुढे नेण्यास उत्सुक आहे. रणवीर अप्रतिम आहे. रणवीर या भूमिकेसाठी पूर्णपणे फिट आहे. या भूमिकेसाठी तो उत्तम आहे. तो खरोखर उत्साही आहे आणि चिंतेत देखील आहे, कारण ही भूमिका म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. या भूमिकेत जेव्हा पुर्वी शाहरुखने जेव्हा अमिताभ बच्चन यांची जागा घेतली होती तेव्हा देखील लोक त्याला म्हणाले की तो बच्चनची जागा कसा घेऊ शकतो?'

पुढे तो म्हणतो की, रणवीर सिंग खूप छान काम करेल याचा मला विश्वास आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट आणि चित्रपट माझ्या व्हिजननुसार काम करेल याची खात्री करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे.

जेव्हा त्याला डॉनची भुमिका साकारण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत हे विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला की, 'आत्मविश्वास, एमर्जी आणि मन लावुन काम करण्याची क्षमता.' डॉन3 चित्रपट जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Protest: राहुल गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात; चर्चेत काय घडलं? सरकारकडून आंदोलकांवर शब्द फिरवल्याचा आरोप

Petrol-Diesel News: पाकिस्ताननंतर अमेरिकेत पेट्रोल महाग! आता भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होणार?

Live Updates Marathi : फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार

NDRF Land Allocation: मावळातील सुदुंबरे येथे एनडीआरएफला ३ हेक्टर सरकारी जमीन विनामूल्य; मंत्रिमंडळाचा निर्णय कायमस्वरूपी तळाला बळ

Pune Crime : नवले पूल परिसरातील लॉजवर पोलिसांचे छापे; नऊ तरुणींची सुटका, लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT