Farhan AKhtar, Shibani Dandekar Google
मनोरंजन

ना सप्तदीचे सूर,ना कबूल है चं वचन,मग फरहान-शिबानी कसं करणार लग्न? वाचा

१९ फेब्रुवारीला एका अनोख्या पद्धतीत फरहान-शिबानी खंडाळा येथे लग्नबंधनात अडकणार आहेत.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये(Bollywood) असे कितीतरी कपल्स आहेत ज्यांचे लग्नसोहळे(Marraige Ceremony) गाजले. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले फरहान-शिबानी हे देखील त्यापैकी एक कपल आहे. फरहान अख्तर(Farhan Akhtar)आणि शिबानी दांडेकर(Shibani Danekar) गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. तब्बल तीन वर्षांनंतर त्या दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. नुकतेच त्यांचा हळदी समारंभ पार पडला. सुरुवातीला सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन समजलं होतं की हे दोघे महाराष्ट्रीयन पद्धतीनं लग्न करणार आहेत. पण आता त्यांच्या लग्नाला घेऊन एक नवीनच बातमी समोर येत आहे. या दोघांनी एका वेगळ्याच अंदाजात लग्न करण्याचा घाट घातला आहे. चला जाणून घेऊया हे लव्हबर्ड्स कसं करणार आहेत लग्न.

फरहान-शिबानी खंडाळा येथील अभिनेत्याच्या आलिशान फार्महाऊसवर लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांचं लग्न अगदी साध्या पद्धतीत होणार असल्याचं बोललं जात आहे. पण तरीही ते थोडं वेगळ्या अंदाजात असेल जेणेकरुन ते लक्षात राहिल असं बोललं जात आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार एवढं तर नक्की की हे दोघे ना सप्तपदी चालणार आहेत, ना तीन वेळा कबूल म्हणत लग्न करणार आहेत. एका खास पद्धतीत ते लग्नबंधनात बांधले जाणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

माहिती समोर येतेय की,दोघे आपल्या लग्नात एकमेकांना काही वचनं देणार आहेत. जी वचनं त्या दोघांनी लिहिली आहेत. आणि हे दोघे सर्व लोकांसमोर ती वचनं वाचून दाखवणार आहे. दोघांना ओळखणाऱ्या मित्रपरिवारातील काहींनी त्यांच्या या अनोख्या लग्नाविषयी म्हटलं आहे की,''या दोघांचं प्रेम कोणत्याही धार्मिक परंपरेच्या पलिकडचं आहे,त्या दोघांनी एकमेकांवर कोणतीही बंधनं न लादता प्रेम केलं आहे''. १९ फेब्रुवारीला खंडाळा येथील फरहानच्या फार्महाऊसवर हे लग्न होणार असल्यानं तिथला सजावटीचा थाट काही औरच आहे. फुलांनी संपूर्ण फार्महाऊस सजवण्यात आलं आहे,तर रोषणाईचा थाट काही औरच आहे. या लग्नाला फक्त ५० जणांचीच उपस्थिती असणार असल्याचं बोललं जात आहे. १९ तारखेला हे अनोख्या पद्धतीतलं लग्न पार पडल्यानंतर २१ फेब्रुवारीला फरहान-शिबानी कोर्ट मॅरेज करणार आहेत. जावेद अख्तर यांनी यासंदर्भातील माहिती दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shocking Incidents 2025: पुणेकर कधीही न विसरणाऱ्या १५ घटना! आजही अंगावर काटा येतो, भयानक होतं २०२५

Valhe News : अभ्यासिका नव्हे... ही तर स्मशानभूमी! आडाचीवाडी येथील विद्यार्थी एकत्र येत दररोज करतात अभ्यास

Farmer Schemes : शेतकऱ्यांसाठी सरकारची पेन्शन योजना; दरमहा मिळणार 3000 रुपये! जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

Success Story: शेतमजुराच्या मुलाची ‘एअर फोर्स’मध्ये निवड; अभिषेक सास्तेची प्रेरणादायी कहाणी

Kolhapur Crime : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आई-वडिलांना बेदम मारहाण; मुलाने डोक्यात घातला लोखंडी बार

SCROLL FOR NEXT