Actor Swapnil Raut e sakal
मनोरंजन

शेतकऱ्याचा मुलगा थेट Hollywood मध्ये, वाचा स्वप्नीलची यशस्वी कहाणी

केतन पळसकर

नागपूर : भारतीयांसाठी चित्रपट, बॉलिवूड हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. ग्लॅमरच्या दुनियेच्या या आकर्षणातून अनेकांनी आपले नशिब अभिनयामध्ये अजमावतात. काही त्यात यशस्वी झाले, काही प्रयत्न करीत आहेत, तर काहींनी ‘हे आपल्याला जमायचे नाही’ असे म्हणत माघार घेतली. मात्र, उपराजधानीतील स्वप्नील राऊतचे (actor swapnil raut) स्वप्न जरा मोठे होते. त्याने चक्क हॉलिवुडपर्यंत मजल मारीत शहराची पताका साता समुद्रापार रोवली आहे.

लिनो यांची निर्मिती असलेला आणि एम. सुधाकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘आय वॉज लॉस्ट’ या म्युझिक अल्बममध्ये स्वप्नील मॉडेल म्हणून झळकला आहे. वेवो चॅनलवर हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. नंदनवन भागातील स्वप्नील हा सर्वसामान्य घरातील मुलगा. त्याचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे. शहरातील व्हीएमव्ही महाविद्यालयामध्ये पदवीचे शिक्षण सुरु असताना त्याला मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. भाऊजी लोकेश गायकवाड यांनी त्याच्या या गुणांना ओळखत त्याला प्रोत्साहन दिले. सुरुवातीला मॉडेल म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्याने भाग घेत ‘वाह वाह’ मिळविली.

पुढे वीरेंद्र गणवीर यांच्या बहुजन रंगभूमीद्वारे त्याने अभिनयाचे धडे घेतले. त्यानंतर तो अभिनयाकडे वळला. मुरुगाडोस दिग्दर्शित आणि प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लिडमध्ये असलेल्या ‘अकिरा’ चित्रपटामध्ये काम केले आहे. सोनाक्षीचा मित्र म्हणून स्वप्नील चित्रपट रसिकांना पाहायला मिळाला. तर, वी चॅनेलवरील ‘ग्लॅडरग्स २०१६’ आणि ‘फिटनेस लीग ऑफ इंडिया’ हे रिॲलिटी शो, लाइफ ओके वरील ‘राजा रंजीत सिंग’ मालिका, वेबसीरीज ‘लव स्टोरी’, ‘खुजाते रहो’ आणि काही जाहिरातीमध्येसुद्धा स्वप्नील झळकला आहे. विशेष म्हणजे, ‘खादी, ‘किग्स ॲंड बेरी’, ‘कुलर्स एथनीक’ अशा जगप्रसिद्ध ब्रँडचा तो ब्रँड एम्बिझिडर आहे. तसेच, नागपूर पोलिसांचा ब्रँड एम्बेसिडर म्हणून नागपूर पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन जनजागृती करतो आहे.

आयुष्यामध्ये काही तरी वेगळ करण्याची इच्छा होती. यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. मॉडेलिंगच्या या क्षेत्रात महाराष्ट्रीयन लोकांना अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडावे लागते. अशातच, ग्लॅडरग्स सारख्या शोमध्ये झळकणारा विदर्भातील मी पहिला मुलगा होतो.
-स्वप्नील राऊत, अभिनेता, मॉडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखल

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होणार? अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT