'Farrey' teaser Salman Khan niece Alizeh Agnihotri debut in bollywood with this thriller movie  SAKAL
मनोरंजन

Farrey Teaser: भाईजान सलमान खानच्या भाचीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, फर्रे सिनेमाच्या टीझरमधून वेधलं सर्वांचं लक्ष

सलमान खानच्या भाचीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

Devendra Jadhav

Farrey Teaser: कतरीना कैफ असो, झरीन खान असो जॅकलीन फर्नांडीस, बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान कायमच नवनवीन कलाकारांना बॉलिवूडमध्ये लॉंच करत असतो. हे कलाकार सुद्धा पुढे बॉलिवूडमध्ये लोकप्रिय होतात.

अशातच सलमान बॉलिवूडमध्ये आणखी एका कलाकाराला लॉंच करण्याच्या तयारीत आहे. ती आहे खुद्द भाईजानची भाची अलिझा अग्निहोत्री. आगामी फर्रे सिनेमातुन अलिझा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. फर्रे सिनेमाचा टीझर नुकताच भेटीला आलाय.

('Farrey' teaser Salman Khan niece Alizeh Agnihotri debut in bollywood)

फर्रे चित्रपटाचा टीझर

अलीकडेच सलमान खानने अलिझाहचा डेब्यू चित्रपट 'फर्रे'चा टीझर शेअर केला आहे. त्याने लिहिले, "मी या F शब्दाबद्दल बोलत होतो, तुम्हाला काय वाटले. 'फर्रे' टीझर आला आहे. सकाळी एक नवीन 'एफ' शब्द शिकलो. हा 47 सेकंदाचा टीझर विद्यार्थ्यांचे आयुष्य दाखवतो. सोबतच त्यांच्यातही समस्या आहेत.हा चित्रपट विद्यार्थ्यांच्या फसवणुकीवर आधारित असल्याचे टीझरवरून स्पष्ट झाले आहे.

फर्रे सिनेमाच्या टीझरमध्ये नेमकं काय?

'फर्रे' हा एक थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये अलिझा परीक्षेत फसवणूक करणाऱ्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसली होती. सिनेमात असं काहीतरी घडतं जिथे अलिझा आणि तिच्या मित्रांच्या आयुष्यात उलथापालथ घडते.

सोमेंद्र पाधी दिग्दर्शित 'फर्रे' हा चित्रपट सलमान खान प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अलिझा नेमकी कोण?

अलिझा अग्निहोत्री ही सलमानची बहीण अलविरा खान आणि निर्माता अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. 'फर्रे'च्या घोषणेमुळे हा अलिझाचा डेब्यू चित्रपट असू शकतो असे दिसते.

काही दिवसांपूर्वी सलमान खानने अलिझाचा आपल्या हातात घेतानाचा हृदयस्पर्शी जुना फोटो शेअर केला होता आणि लिहिले होते, “मामूवर एक उपकार कर, तू जे काही करशील ते मनापासून आणि मेहनतीने कर. नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात सरळ जा. फक्त स्वतःशीच स्पर्धा करा."

अशी पोस्ट लिहून सलमानने अलिझाची आठवण शेअर केली होती. आता सलमानची भाची अलिझा बॉलिवूड कसं गाजवणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT