Fashion designer Rohit Bal on Ventilator admitted to Delhi’s Hospital  Esakal
मनोरंजन

Rohit Bal: प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती गंभीर! देतोय मृत्यूशी झुंज

चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची तब्येत बिघडली आहे.

Vaishali Patil

Fashion designer Rohit Bal: मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलची प्रकृती खुपच चिंताजनक आहे. 62 वर्षीय रोहितला हृदयविकारामुळे गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तो सध्या व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो रुग्णालयात आहेत.

रोहितला 2010 मध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला दारूचे व्यसन होते. इतर आरोग्यविषयक कारणांमुळे त्याला व्यसन मूक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही रोहितची प्रकृती खूपच खालावली होती. त्यावेळीही त्याला मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

कोण आहे रोहित बल?

बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध डिझायनर्सच्या यादीत रोहितचा समावेश आहे. आजही रोहित बल आपल्या पूर्वजांच्या फॅशनला आदर्श मानून आपले कपडे डिझाइन करतो. मुघल फॅशन पुढे नेणारा रोहित हा एकमेव प्रसिद्ध डिझायनर आहे.

फॅशन इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंत त्याचे मोठे नाव आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगळुरू, अहमदाबाद आणि चेन्नईसह अनेक ठिकाणी त्याची दुकाने आहेत.

रोहितने अमिताभ बच्चन, काजोल, ईशा गुप्ता, कंगना राणौत, पूजा हेगडे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसाठी कपडे डिझाइन केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT