fast furious 9 trailer  Team esakal
मनोरंजन

फास्ट अँड फ्युरियसचा ट्रेलर आला; गंज राडा...

फास्ट अँड फ्युरिअसच्या नवव्या भागाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - हॉलीवूडमधील काही चित्रपट असे आहेत की ज्यांच्या प्रदर्शित होणा-या प्रत्येक भागाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. याबाबत काही उदाहरणे द्यायची झाल्यास हॅरी पॉटर, पायरेट्स ऑफ कॅरिबियन, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, जुमानजी, ज्युरासिक पार्क, फायनल डेस्टिनेशन, अॅव्हेंजर आता यात फास्ट अँड फ्युरियसचेही नाव घ्यावे लागेल. आतापर्यत या चित्रपटाचे आठ भाग प्रदर्शित झाले आहेत. नव्या भागाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. ती आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण या चित्रपटाचा नववा भाग प्रदर्शित होणार आहे. फास्ट अँड फ्युरिअसच्या नवव्या भागाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

ज्यावेळी चाहत्यांना कळाले की, फास्ट अँड फ्युरिअसच्या नव्या भागाच्या ट्रेलरची माहिती कळाली तेव्हा त्यांचा त्या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. काल प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला 9 लाखांपेक्षा अधिक हिट्स मिळाले आहेत. गेल्या आठही भागांना प्रेक्षकांनी पसंत केले आहे. काही दिवसांपासून प्रेक्षक नव्या भागाची प्रतिक्षा करत होते. अॅक्शन, थ्रिलर म्हणून ओळख असलेल्या फास्ट अँड फ्युरिअसनं प्रेक्षकांना आपलेसं केलं आहे. जगभरात आतापर्यत या चित्रपटाच्या आठही भागांनी कोट्यवधी रुपयांचा बिझनेस केला आहे. लहानांपासून मोठ्यांनाही या चित्रपटानं वेड लावले होते. आता जो ट्रेलर प्रदर्शित झाला आहे त्यात अभिनेता विन डीजल आणि जॉन सेना यांचे अॅक्शन सीन जबरदस्त आहेत.

फास्ट अँड फ्युरिअसचा हा ट्रेलर इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झाला आहे. यापूर्वीही या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. आता त्याचा दुसरा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. आताच्या ट्रेलरमध्ये विन डीजल हा आपला भाऊ जॉन सेना याच्याशी टक्कर घेताना दिसतोय. फास्ट अँड फ्युरिअसच्या नवव्या भागाचे दिग्दर्शन जस्टिन लीन यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी या चित्रपटाच्या 3,4,5 आणि सहाव्या भागाचे दिग्दर्शन केले होते. इतर भागांप्रमाणेच या भागातही कमालीचा वेग, अॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

विनला जोरात कार चालवणे पसंत आहे. ती त्याची खासियत आहे. त्यासाठी त्याला मित्र परिवारामध्ये ओळखले जाते. याशिवाय चित्रपटामधील संवादही सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहेत. हिंदीतील संवादांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT