fatima sana shaikh file image
मनोरंजन

'दंगल गर्ल' फातिमा म्हणते, 'मी बेरोजगार'

फातिमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रियांका कुलकर्णी

कोरोना महामारीमुळे चित्रपटांचे शूटिंग बंद झाले. त्यामुळे अनेक कलाकार सध्या घरीच वेळ घालवत आहेत. याविषयी बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने fatima sana shaikh आपले मत मांडले. जेव्हा फातिमा तिच्या घराबाहेर काही कारणामुळे पडली तेव्हा तिला पत्रकारांनी प्रश्न विचारले. तिचे उत्तर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फातिमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (fatima sana shaikh tells paparazzi she is currently unemployed)

फातिमाच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती फोटोसाठी पोज देत आहे. काही पत्रकारांनी तिला विचारले की, 'सध्या तू कोणत्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेस?' यावर फातिमाने उत्तर दिले, 'जेव्हा कोरोना कमी होईल, किंवा संपेल तेव्हा जसे सगळ्यांना काम मिळेल तसेच मला पण मिळेल. सध्या तरी मी बेरोजगार आहे.' यावेळी फातिमाने तिच्या चाहत्यांना 'कोरोना काळात घरी सुरक्षित राहा आणि काळजी घ्या' असा संदेश दिला.

फातिमाने तिच्या करिअरची सुरुवात 'दंगल' चित्रपटामधून केली. या चित्रपटामध्ये फातिमाने आमिर खान आणि सान्या मल्होत्रा या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसली. त्यानंतर ठग्स ऑफ हिंदोस्तान, ल्युडो, सूरज पे मंगल भारी आणि अजीब दास्ता या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.https://www.youtube.com/watch?v=5N_JUypgSR4

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT