Fauda Actor Idan Amedi Seriously Injured Fighting In Gaza Esakal
मनोरंजन

Israel-Hamas war: गाझामध्ये हमाससोबत लढताना प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी! उपचार सुरू

गाझामध्ये इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात झालेल्या लढाईत इदानला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

Vaishali Patil

Fauda Actor Idan Amedi Seriously Injured Fighting In Gaza: सध्या इस्रायल-हमास युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे गाझामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझामध्ये युद्धबंदीची मागणी सर्वच देश करत आहेत, मात्र इस्रायल त्यासाठी तयार नाही. त्यावेळी जगभरात तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यादरम्यान मनोरंजन जगताशी संबंधित एक वाईट बातमी समोर आली आहे.

बहुचर्चित वेबसिरिज 'फौदा' फेम अभिनेता इदान अमेदीबद्दल ही बातमी आहे. गाझामध्ये इस्रायली सैन्य आणि हमास यांच्यात झालेल्या लढाईत इदानला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इदान अमेदीला या युद्धादरम्यान गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचावर उपचार सुरू असून तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

इदानच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे. तर इदानच्या भावानेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून याबद्दल चाहत्यांना सांगितले आहे.

इदान हा इस्रायली आर्मी आयडीएफचा राखीव सैनिक म्हणून गाझा पट्टीत हमासच्या अतिरेक्यांविरुद्ध लढत होता, 8 डिसेंबर रोजी तो गंभीर जखमी झाला. इदानला विमानाने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

इदानच्या दुखापतीबद्दल इस्रायली नेत अविया लेवी याने देखील ट्विटरवर लिहिले की, 'फौदा' फेम इदान अमेदी गाझामधील लढाईदरम्यान गंभीर जखमी झाला आहे. इदान लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना करतो.

इदानने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेयर केला होता. या व्हिडिओद्वारे या लढ्यात त्याच्या सहभागाबद्दल लोकांना सांगितले होते. या व्हिडिओत इदानने म्हटले होते की आम्ही मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्याचा सामना करत आहेत. मी संरक्षण दलात सामील होत आहे. या व्हिडीओत त्याने लष्कराचे कपडे घातले होते.

तसेच ही पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, हा कोणत्याही चित्रपटाचा किंवा फौदाचा सीन नाही. मी आज वेगळ्या कपड्यांमध्ये आहे कारण मी आता युद्धात सहभागी होत आहे.

या बातमीनंतर इदानचे चाहतेही खुप काळजीत पडले आहे. आता चाहते इदान लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT