fauj the maratha batalion marathi movie first look out now SAKAL
मनोरंजन

Fauj Movie: मराठा शूरवीरांची शौर्यगाथा सांगणार 'फौज' द मराठा बटालियन, देशप्रेम जागवणारं पोस्टर भेटीला

मराठा बटालियनची शौर्यगाथा सांगणाऱ्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Devendra Jadhav

Fauj The Maratha Batalion Movie News: सध्या अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याशिवाय ऐतिहासीक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच आणखी एक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे 'फौज'.

'फौज' सिनेमाची आज घोषणा झाली. यानिमित्ताने आज सिनेमाचं पोस्टर लॉंच झालंय. मराठा बटालियनची शौर्यगाथा सांगणाऱ्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

(Fauj the maratha batalion marathi movie first look out now)

'फौज' हा शब्द ऐकताच अंगावर शहारा येतो. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान निश्चितच अभिमानास्पद आहे. या फौजेमुळेच आपण इथे सुरक्षित असतो.

त्यांची सीमेवरील हिच शौर्यगाथा सांगणारा ‘फौज - द मराठा बटालियन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. स्वामी चरण फिल्म्स प्रस्तुत, निर्मित हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होईल.

पोस्टरमध्ये फौजी सीमेवर देशाचे रक्षण करताना दिसत असून देशाच्या अभिमानासाठी आणि संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे हे सैनिक म्हणजे देशाची सर्वात मोठी संपत्ती.

या शूरवीर फौजींची विजयगाथा 'फौज - द मराठा बटालियन’मधून पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ‘’ मराठा बटालियन ही भारतीय सैन्यातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. इंग्रजांच्या काळातही ती होती. मराठा बटालियनला सर्वात चपळ आणि शूर मानले जाते.

या मराठा बटालियनने इंग्रजांच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक शौर्य गाजवले आहे. त्याच एका शौर्यकथेमधील एक गोष्ट ‘फौज द मराठा बटालियन’ या सिनेमाच्याद्वारे आम्ही मांडतोय." अशाप्रकारे ‘फौज - द मराठा बटालियन’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी चेन्नईमध्ये विकासकामांची पायाभरणी केली

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT