fighter teaser out now starring hrithik roshan deepika padukon anil kapoor  SAKAL
मनोरंजन

Fighter Teaser: वंदे मातरम! हृतिक - दीपिकाच्या 'फायटर'चा थरारक टीझर रिलीज

हृतिक - दीपिकाच्या फायटर सिनेमाचा थरारक टीझर रिलीज झालाय

Devendra Jadhav

Fighter Teaser: गेल्या अनेक दिवसांपासुन हृतिक रोशन - दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या 'फायटर' सिनेमाची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात सिनेमातील कलाकारांच्या भूमिकेची ओळख करुन देणारे पोस्टर भेटीला आले.

आता नुकतंच फायटर सिनेमाचा थरारक टीझर रिलीज झालाय. देशप्रेमाने भारलेला टीझर सर्वांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

फायटरचा टीझर रिलीज

हृतिक रोशन - दीपिका पदुकोण - अनिल कपूर यांच्या फायटर टीझरमध्ये सुरुवातीला हृतिक रोशन चालत येत असलेला दिसतो. पुढे वायुसेनेची थरारक कामगिरी पाहायला मिळते. टीझरमध्ये दीपिका - अनिल कपूर सुद्धा तडफदार भूमिकेत पाहायला मिळतात.

टीझरच्या शेवटी हृतिकच्या मागे भारताचा तिरंगा बघून अंगावर रोमांच उभे राहतात. एकूणच फायटर सिनेमा थिएटरमध्ये पाहणं ही सर्वांसाठी पर्वणी असणार यात शंका नाही.

फायटरची रिलीज डेट

फायटर सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा २६ जानेवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. पठाण सिनेमा २०२३ ला प्रजासत्ताक दिनाला रिलीज झाला होता. पठाणने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली होती. त्यामुळे आता सिद्धार्थचा फायटर पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT