filmfare award 2023 Ankush Gedam preparing for police service but nagraj gives chance in jhund movie career struggle family background
filmfare award 2023 Ankush Gedam preparing for police service but nagraj gives chance in jhund movie career struggle family background sakal
मनोरंजन

Ankush Gedam: पोलिस भरतीची तयारी करता करता 'डॉन' बनला अंकुश गेडाम.. फिल्मफेअर विजेत्या अभिनेत्याची कहाणी..

नीलेश अडसूळ

Filmfare Awards 2023 : चित्रपट जगतातील अत्यंत मानाचा आणि महत्वाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे 'फिल्मफेअर'. या पुरस्काराची कलाकारांप्रमाणेच प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा 'फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023' नुकताच पार पडला. फिल्मफेअर पुरस्काराचे यंदाचे आयोजन मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे करण्यात आले होते.

यावर्षी फिल्मफेअर मध्ये गंगूबाई काठियावाडी, बधाई दो या सिनेमांनी चांगलीच सरशी केली. पण चर्चा होतेय ती 'झुंड' चित्रपटाची. कारण सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठीचा पुरस्कार 'झुंड' मधील अंकुश गेडाम याला मिळाला.

याची निमित्ताने पाहून पोलिस भरतीला निघालेल्या अंकुशला नागराज मंजुळेनं कसं हेरलं आणि अंकुश गेडाम कसं गुंड झाला ते...

(filmfare award 2023 Ankush Gedam preparing for police service but nagraj gives chance in jhund movie career struggle family background)

'झुंड' या चित्रपटात अंकुशने 'डॉन'ची भूमिका साकारली आहे. पण त्यामागे त्याची एक भन्नाट स्टोरी आहे. एका मुलाखतीत अंकुश म्हणाला होता, 'मी गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत होतो. तेव्हा नागराज सरांचे भाऊ भूषण मंजुळे यांनी माझे फोटो आणि व्हीडीओ काढले. मी त्यांना विचारलं की, तुम्ही माझे फोटो का काढले? तेव्हा त्यांनी आम्ही शॉर्टफिल्म बनवणार असल्याचं सांगत मला ऑडिशनला बोलावलं.'

'डोक्यावर खोट्या केसांचा मोठ्ठा विग आणि जर्सी-बर्मुडा घालून मी बेभान होऊन नाचत होता. आणि तिथेच सरांनी माझी निवड केली. पण मला अभिनय करायचा नव्हता. मी पोलिस भरतीची तयारी करत होतो, पण मला नशिबाने ही भूमिका मिळाली आणि मी डॉन झालो.'

पुढे तो म्हणाला, 'सिनेमात दाखवलंय तसं मी कधीही नशा वगैरेही केली नव्हती. अॅक्टिंग पण येत नव्हती. मला एक सीन दिला. त्यांनी सांगितलं की, तू क्रिमिनल आहेस. पण मी त्यांना नकार दिला. मग ते म्हणाले आहे भूमिका आहे, तसं समज तू आणि काम कर. त्यावेळी एका वॉचमन सोबत सीन शूट केला आणि तो नागराज सरांना पाठवला. तो सीन त्यांना कदाचित आवडला असेल, म्हणून मला ही भूमिका मिळाली.

'पुढे मग मला पुण्याला यायला सांगितलं. तेव्हास्क्रिप्ट वाचून दाखवली. तेव्हापर्यंत मला माहीत नव्हतं मी डॉनचं काम करणार आहे. ते कळल्यावर मी किती खूश झालो हे सांगू नाही शकत,' अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT