Filmfare Awards 2024 technical awards see winner full list jawan 12th fail sam bahadur  SAKAL
मनोरंजन

Filmfare Awards 2024: 'जवान' आणि '12th फेल'ने मारली बाजी, बघा कोणाला कोणते पुरस्कार मिळाला?

फिल्मफेअर पुरस्कारांची काल गुजरातच्या गांधीनगरमध्ये घोषणा झालीय

Devendra Jadhav

Filmfare Awards 2024 News: 69व्या फिल्मफेअर पुरस्कारांची सुरुवात शनिवारी गुजरातमध्ये एका कार्यक्रमाने झाली. दरवर्षी होणाऱ्या या अवॉर्ड शोची प्रत्येकजण वाट पाहत असतो. दोन दिवस चालणाऱ्या या अवॉर्ड शोचे गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय आज संध्याकाळी सुद्धा मुख्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. दरम्यान काल रात्री फिल्मफेअरमधल्या टेक्निकल पुरस्कारांची घोषणा झाली. बघा विजेत्यांची संपूर्ण यादी.

(Filmfare Awards 2024 technical awards see winner full list)

टेक्निकल अवॉर्ड्स ची संपूर्ण यादी

  1. बेस्ट साउंड डिजाइन – ‘सॅम बहादुर’ – कुणाल शर्मा - 'ॲनिमल' - सिंक सिनेमा

  2. बेस्ट वीएफएक्स- ‘जवान’ – रेड चिलीज वीएफएक्स

  3. बेस्ट एडिटिंग – ’12th फेल’ – जसकुंवर सिंह कोहली आणि विधु विनोद चोप्रा

  4. बेस्ट बैकग्राउंड स्कोर – ‘ॲनिमल’ – हर्षवर्द्धन रामेश्वर

  5. बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन – ‘सॅम बहादुर’ – सुब्रत चक्रवर्ती आणि अमित रे

6. बेस्ट कॉस्टयूम डिजाइन – ‘सॅम बहादुर’ – सचिन लवलेकर, दिव्या गंभीर आणि निधि गंभीर

7. बेस्ट सिनेमैटोग्राफी- ‘थ्री ऑफ अस’ – अविनाश अरुण धावरे

8. बेस्ट कोरियोग्राफी – ‘व्हॉट झुमका’ – गणेश आचार्य (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

9. बेस्ट ॲक्शन – ‘जवान’ – स्पाइरो रजाटोस, एनल अरासु, क्रेग मैक्रे, यानिक बेन, केचा खम्फाकडी आणि सुनील रोड्रिग्स

करण जोहरसोबतच जान्हवी कपूर, गणेश आचार्य, अपारशक्ती खुराना, जरीन खान आणि करिश्मा तन्ना यांच्यासह अनेक मोठे फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला स्टार्स येथे उपस्थित होते. अपारशक्ती खुराना आणि करिश्मा तन्ना हे कलाकार सुद्धा ६९ व्या फिल्मफेअर अवॉर्ड शोसाठी गुजरातला उपस्थित होते.

६९ व्या फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक चर्चा होती ती विधु विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेलची. या चित्रपटानं अनेक कॅटगिरीतून आपल्या नावावर पुरस्कार केल्याचे दिसून आले. त्याला बेस्ट स्क्रिन प्ले साठी गौरविण्यात आले आहे. तर सर्वोत्कृष्ट कथेसाठी अक्षय कुमारच्या ओएमजी २ ला पुरस्कार देण्यात आला आहे.

फिल्मफेयरमध्ये मानाचा समजला जाणारा आर डी बर्मन बेस्ट अपकमिंग म्युझिक टँलेंट पुरस्कार हा श्रेयस पुराणिकला मिळाला आहे. त्याला अॅनिमलमधील सतरंगासाठी पुरस्कार मिळाला आहे. यावेळी त्यानं त्याच्या भावना व्यक्त करताना ज्यांना आपण संगीतातील आदर्श मानतो त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT