Anurag Kashyap daughter Esakal
मनोरंजन

Anurag Kashyap: जेव्हा मुलीला बलात्काराची धमकी अनुराग घाबरला... नैराश्यात...

सकाळ डिजिटल टीम

अनुराग कश्यप याची गणना टॉप दिग्दर्शकांच्या यादीत केली जाते. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचं दिग्दर्शन केले आहे. नुकतच त्याने मराठी मनोरंजन विश्वावर केलेल्या वक्तव्यामूळे चर्चेत आलायं. मात्र तोच नाही तर त्यांची मुलगी आलिया कश्यप देखील तितक्याच चर्चेत असते. पण प्रसिद्धीच्या झोतात त्याचं आयुष्यही सोपं नव्हतं. खुद्द अनुराग कश्यपने खुलासा केला होता की, एक वेळ तो डिप्रेशनशी झुंज देत होता.

आज जरी अनुराग कश्यपची गणना इंडस्ट्रीतील नामांकित व्यक्तींमध्ये होत असली तरी एक काळ असा होता जेव्हा हे चकचकीत जग त्याच्यासाठी इतकं सोपं नव्हतं. एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वर्ष त्याचं आयुष्यात नैराश्यात होतं .

इतकंच नाही तर अनुराग कश्यपने त्याची मुलगी आलिया कश्यपबद्दलही असे काही खुलासे केले आहेत. ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यास तुम्हालाही एकदा आश्चर्य वाटेल. दिग्दर्शकाने सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांची मुलगी आलियाला बलात्काराची धमकी दिली जात होती.

हे ही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हे प्रकरण त्यावेळचं आहे जेव्हा तो जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात गेला होता आणि CAA विरोधी आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातही आवाज उठवला. इंडियन एक्स्प्रेसच्या दाव्यानूसार तो म्हणाला होता की, माझ्या मुलीला ट्रोल केलं जात असल्यानं मी त्यावेळी ट्विटरही बंद केले होते. तिला बलात्काराची धमकी दिली जात होती आणि याच कारणामुळे आलियाला झटके येऊ लागले होते.

आपल्या मुलीबद्दल बोलताना तो म्हणाला होता की, "मला एक छान मुलगी आहे. तिला प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने बोलायला आवडते. पण तिची चिंता मला असते. जेव्हा परिस्थिती खराब होऊ लागली आणि तिला धमक्या मिळू लागल्या, तेव्हा तिची चिंताही वाढली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : सीएम, उपमुख्यमंत्री, ४ मंत्री, १२ आमदार, १ खासदार; 'सगळ्यांच्या विरोधाला एकटा बास', सतेज पाटलांचं कसं होतं मायक्रो प्लॅनिंग

Viral Video : नातवाने आजी-आजोबांना दिलं आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट, व्हिडिओ पाहून तुमचंही हृदय येईल भरुन

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठण-कन्नड तालुक्यात उमेदवारी अर्ज विक्रीला चांगला प्रतिसाद

Operation Langda: अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या 'अबान'ला भर चौकात पोलिसांनी शिकवला धडा; कसा केला एन्काऊंटर?

शनी देव परवडतात पण राहूची भीती कायम! 'राहू' नको म्हणणाऱ्यांसाठी खास भविष्य

SCROLL FOR NEXT