Liladhar Sawant,Pushpa Sawant ANI/ Twitter
मनोरंजन

‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक लीलाधर सावंत आर्थिक संकटात

लीलाधर यांच्या पत्नी पुष्पा यांनी एएनआय वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्यावरील आर्थिक संकटाबद्दल सांगितले.

प्रियांका कुलकर्णी

कोरोना काळात अनेक क्षेत्रांना आर्थिक फटका बसला. तसेच कलाक्षेत्राला देखील आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अनेक हिंदी चित्रपटांचे कला दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक लीलाधर सावंत (Liladhar Sawant) यांचे कुटुंब सध्या आर्थिक विवंचनेत आहे. लीलाधर यांच्या पत्नी पुष्पा यांनी एएनआय वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, 'लीलाधर यांच्या दोन बायपास सर्जरी झाल्या असून त्यांना दोनदा ब्रेन हॅमरेजचे अटॅक आले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारांवर सर्व पैसे खर्च झाले आहेत. दरम्यान लीलाधर यांना आता बोलणंही शक्य होत नाही.' (Financial crisis on the family of Dadasaheb Phalke award winning director Liladhar Sawant wife urges celebrity for help)

पुष्पा यांनी मुलाखतीत त्यांचे कुटुंब सध्या खडतर आयुष्य जगत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी पुष्पा यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडे मदतीची याचना केली आहे. ज्या कलाकारांनी लीलाधर यांच्यासोबत काम केलंय त्यांनी मदतीसाठी पुढे यावं असं पुष्पा सावंत म्हणाल्या. ‘हत्या’ या सिनेमासाठी लीलाधर यांनीच गोविंदाचं नाव सुचवलं होतं असं पुष्पा यांनी या मुलाखतीत सांगितलं. “सध्या आम्ही दोघं कठीण काळात असून मुश्किलीने आमचं जीवन व्यतीत करत आहोत.” असं पुष्पा म्हणाल्या. लीलाधर सावंत यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

लीलाधर सावंत यांनी ‘हत्या’, ‘110 डेज’, ‘दीवाना’, ‘हद कर दी आपने’ यांसारख्या जवळपासस १७७ सिनेमांसाठी कला दिग्दर्शन केलंय. त्यांना आजवर दादासाहेब फाळके तसंच फिल्मफेअर आणि इतर काही पुरस्कार मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT