kangana Ranaut Team esakal
मनोरंजन

कंगना राणावतच्या बॉडीगार्डवर बलात्काराचा गुन्हा

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप

स्वाती वेमूल

मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावतचा Kangana Ranaut बॉडीगार्ड कुमार हेगडेविरोधात Kumar Hegde बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. डी. एन. नगर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय ब्युटिशियनने हेगडेविरोधात बलात्काराचा आरोप केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून हेगडेने बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न करण्याचं आश्वासन त्याने दिलं होतं आणि तो लग्न करेल या विश्वासाने त्याच्या म्हणण्यानुसार लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला तयार झाले होते, असं ती महिला म्हणाली. (FIR filed against Kangana Ranaut bodyguard Kumar Hegde in a rape case)

दाखल केलेल्या एफआयआरनुसार, आरोपी आणि महिला गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यानंतरही त्याने बळजबरी केल्याचा आरोपही महिलेनं केला आहे. "याप्रकरणी एफआयआर दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत", अशी माहिती पोलीस उपायुक्त चैतन्य यांनी दिली.

आईची तब्येत बरी नसून तिच्या उपचारासाठी पैसे हवेत, असं सांगून आरोपीने ५० हजार रुपये घेतले. ते पैसे घेतल्यापासून त्याच्याशी संपर्क होऊ शकत नाही, अशीही माहिती महिलेनं दिली. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३७७ आणि ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT