Munmun Dutta Instagram
मनोरंजन

'तारक मेहता..'च्या 'बबिता'विरोधात एफआयआर दाखल

जातीवाचक शब्द वापरल्याने मुनमुन दत्ता अडचणीत

स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या लोकप्रिय मालिकेत बबिताची Babita भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता Munmun Dutta हिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हरयाणामधील हिस्सार इथं मुनमुनविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. एका व्हिडीओमध्ये मुनमुनने जे जातीवाचक शब्द वापरले त्याविरोधात तिच्यावर ही कारवाई झाली आहे. (FIR filed against Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor babita aka Munmun Dutta for using casteist slur)

नेमकं काय आहे प्रकरण?

मुनमुनने तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत बोलताना तिने जातीवाचक शब्द वापरले. याप्रकरणी सोशल मीडियावर तिच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. त्याचप्रमाणे तिच्या अटकेचीही मागणी केली जात होती. वाद चिघळत असल्याचं लक्षात येताच तिने नंतर सोशल मीडियावर माफीनामा सादर केला.

मुनमुन दत्ताचा माफीनामा-

'मी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मी वापरलेल्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू अजिबात नव्हता. भाषेच्या मर्यादेमुळे मला त्या शब्दाबद्दलचा नेमका अर्थ माहित नव्हता. त्याबद्दल समजताच नंतर मी व्हिडीओतून तो भाग काढून टाकला होता. मी प्रत्येक जात, पंथाच्या व्यक्तींचा आदर करते. मी अनवधानाने वापरलेल्या शब्दासाठी मनापासून माफी मागते', अशी पोस्ट तिने लिहिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT