FIR registered against Amitabh Bachchan and show makers for regarding Manusmriti 
मनोरंजन

 'कुठल्या धर्मग्रंथाचे दहन करण्यात आले' ? हा प्रश्न अमिताभ यांना पडला महागात

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती हा वादाच्या भोव-यात सापडली आहे. यावेळी अमिताभ यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकाला मनुस्मृती दहनाविषयी एक प्रश्न विचारला. त्यावरुन त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरुन नेटक-यांनी केबीसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याशिवाय अमिताभ यांनाही नेटक-यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे.

कौन बनेगा करोडपती या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाचा आता 12 वा सीझन सुरु आहे. 29 सप्टेंबर रोजी त्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. या शो चे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक भाग हा त्याच्यातील वेगळेपणासाठी प्रसिध्द आहे. तसेच तो अनेकदा त्यात विचारल्या गेलेल्या प्रश्नांवरुन वादातही सापडला आहे. त्यादिवशीच्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी कर्मवीरच्या विशेष भागात मनुस्मृतीविषयी प्रश्न विचारला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन आणि अभिनेता अनुप सोनी हे पाहुणे कलाकार म्हणून सहभागी झाले होते. 

25 डिसेंबर 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी कुठल्या धर्मग्रंथाचे दहन केले होते? त्यासाठी विष्णुपुराण, भगवदगीता, ऋग्वेद आणि मनुस्मृती यांचे पर्याय देण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांनी प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर अमिताभ यांनी या प्रश्नाविषयी थोडं भाष्य केलं ते असे की, 1927 साली डॉ. आंबेडकर यांनी ज्या मनुस्मृतीचे दहन केले त्यात त्यावेळच्या हिंदु धर्म आणि जातीव्यवस्थेचं समर्थन करणारी मांडणी त्या ग्रंथात होती. त्यामुळे त्यांनी त्या ग्रंथाचे दहन केले.

यावर काही नेटक-यांनी हा कार्यक्रम ''डावे'' विचारसरणीचे लोकं चालवत असल्याचा आरोप केला आहे. "leftists propaganda" करण्यासाठी अशाप्रकारचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. यामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे लखनौ येथे  कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाचे आयोजक आणि अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी यावर एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यातून त्यांनी हा कार्यक्रम कॉमिज समुहाकडून हा कार्यक्रम हायजॅक करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच या कार्यक्रमामुळे लहान मुलांच्या मनावर आपल्या हिंदु संस्कृतीविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. त्याला अग्निहोत्री यांनी कोडिंग असे म्हटलं आहे. भाजपचे आमदार अभिमन्यु पवार यांनी सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्यावर तक्रार दाखल करावी अशी मागणी केली आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT