first James Bond dies at 90 
मनोरंजन

पहिला जेम्स बाँड सिन कॉनेरी कालवश

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - जगभरात प्रचंड लोकप्रिय असणा-या जेम्स बाँड या चित्रपट मालिकेतील पहिल्या जेम्स बाँड अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. सिन कॉनेरी असे त्या अभिनेत्याचे नाव होते. शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अभिनयाने सगळ्या जगातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेणा-या कॉनेरीच्या जाण्याने हॉलीवूडवर मोठी शोककळा पसरली आहे. 90 वर्षांचं दीर्घ आयुष्य लाभलेल्या या अभिनेत्याला जेम्स बाँडच्या चित्रपटाने वेगळी ओळख मिळवून दिली.

इयान फ्लेमिंग लिखित जेम्स बाँड  चित्रपटांतील पहिला बॉड म्हणून त्य़ांचे नाव घ्यावे लागेल. त्यांचे वार्धक्याने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली. जगभरातल्या प्रेक्षकांना बाँडपटांनी वेड लावले होते. 1962 मधील बॉड चित्रपटात त्यांनी काम केले होते. जेम्स बाँडच्या एकूण सहा चित्रपटांमध्य़े त्यांनी काम केले. त्यांना त्यांच्या अभिनयातील कौशल्याबद्दल 2000 मध्ये राणी एलिझाबेथ यांच्याकडून गौरविण्यात आले होते.

अशा या महान अभिनेत्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले. त्यात एका ऑस्करचा समावेश आहे. तसेच त्यांनी तीन गोल्डन ग्लोब, दोन बाफ्ता पुरस्कारही मिळवले. त्यांच्या जाण्याने बाँडपटाच्य़ा चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कॉनेरी यांनी द क्रुसेड, इंडियाना जोन्स. द हंट फॉर रेड ऑक्टोबर चित्रपटांमधूनही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. दोन दशके त्यांनी जेम्स बाँडम्हणून मोठा मानसन्मान प्राप्त केला.  From Dr No in 1962, to Never Say Never Again in 1983 हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले.

ऑगस्टमध्ये कॉनेरी यांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्यानंतर आलेल्या जेम्स बाँड अभिनेत्यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. त्या दशकातल्या प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणा-या कॉनेरी यांचा चाहतावर्गही लाखोंच्या घरात होता. 25 ऑगस्ट 1930 रोजी स्कॉटलंड मधील एडिनबर्ग येथे जन्म झालेल्या कॉनेरी यांच्या  Dr No (1962), From Russia With Love (1963), Goldfinger (1964), Thunderball (1965), You Only Live Twice (1967), Diamonds Are Forever (1971), and Never Say Never Again (1983) या सात बाँडपटातील   भूमिका अजरामर आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Google Gemini AI Photo Prompt: तेच ते प्रॉम्प्ट वापरून कंटाळला आहात? सुंदर फोटोसाठी स्वत:च बनवा 'असे' क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT