first look of BhoolBhulaiyaa 2 is released  
मनोरंजन

#BhoolBhulaiyaa2 : '13 साल बाद भूलभुलैय्या 2 येतोय'; अक्षयला केले रिप्लेस!

सकाळ डिजिटल टीम

अक्षय कुमारने आपल्या दमदार अभिनयाने 2007 मध्ये 'भूलभुलैय्या' गाजवला होता. मागील अनेक दिवस 'भूलभुलैय्या'चा पार्ट 2 येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आज (ता. 19) अखेर या चर्चांना पूरणविराम मिळाला आहे. 'भूलभुलैय्या 2'चे पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले. पण हो, यात अक्षयकुमार नाहीये बरं का!

'भूलभुलैय्या'च्या दुसऱया पार्टच्या पोस्टरमध्ये जो अभिनेता दिसतोय, त्याचा लूक बघून अक्षय कुमारची आठवण आल्याशिवाय राहात नाही. या पोस्टरमध्ये दिसतोय नवोदित अभिनेता कार्तिक आर्यन! या पोस्टरमध्ये तो भगवी वस्त्र, डोक्याला बांधलेला भगवा रूमाल, गॉगल आणि हातात रूद्राक्षांच्या माळा अशा अवतारात दिसतोय. ट्विटरवर #BhoolBhulaiyaa2 असा हॅशटॅगही ट्रेंडिंग आहे. या पोस्टरमध्ये कार्तिक आर्यन दिसल्याने मात्र काही चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अक्षय कुमारशिवाय कोणीच 'आदित्य श्रीवास्तव' चांगला साकारू शकत नाही असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे, तर काहींनी कार्तिकच्या या पोस्टरचे स्वागत केले आहे.

या चित्रपटाची निर्मिती टी सिरीज करत आहे. तर अनीस बाझमी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आता कार्तिक आर्यन चाहत्यांवर छाप पाडू शकतो की नाही यावर सर्वांचे लक्ष आहे... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT