Miss-U-Mister--New-Marathi
Miss-U-Mister--New-Marathi 
मनोरंजन

सिद्धार्थ-मृण्मयी पुन्हा एकत्र झळकणार; "मिस यू मिस्टर"चे पहिले पोस्टर प्रकाशित

सकाळवृत्तसेवा

अग्निहोत्र या मालिकेतील गाजलेली जोडी व मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे हे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 21 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थ्री आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. "मिस यू मिस्टर" या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले.

‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.

चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली की, 'मिस यू मिस्टर'चे लेखक आणि दिग्दर्शक समीर जोशी यांच्याबरोबरचा हा माझा दूसरा चित्रपट असून या आधी मी त्याच्या'मामाच्या गावाला जाऊया' या सिनेमामध्ये काम केले होते. 'मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते’.

‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला की, ‘मृण्मयी आणि मी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमध्ये काम केले आहे. मृण्मयी देशपांडे ही खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळे मलादेखील सिनेमामध्ये तिच्यासोबत काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे’.

‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही, पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,” ते म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT