अभिनेता 'माधव देवचके'ने बिग बॉसच्या स्पर्धकांविषयी म्हणाला... sakal media
मनोरंजन

अभिनेता 'माधव देवचके'ने बिग बॉसच्या स्पर्धकांविषयी म्हणाला...

जवळपास दोन वर्ष झाली या गोष्टीला, परंतु मी बिग बॉसच्या घराला खूप मीस करतोय. खूप छान प्रवास होता. त्या घराची एक जादू म्हणजे माणसाचं आयुष्य बदलून जातं

शब्दांकन : अरुण सुर्वे

पुणे : 'बिग बॉस' मराठीच्या तिस-या पर्वाची सगळीकडेच खूप चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच दुसरं पर्व गाजवणारा अभिनेता 'माधव देवचके'ने पहिल्यांदाच स्पर्धकांविषयी व बिग बॉसच्या घराविषयी आपले मत मांडले आहे. सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून 'माधव देवचके' लवकरच रूपेरी पडद्यावर तुमच्या भेटीला येणार आहे. माधवचे फॅन्स जगभर आहेत. तसेच तो सोशल मीडियावर देखिल ॲक्टीव्ह असतो.

माधव बिग बॉसच्या घराविषयी सांगतो, "मी ६३ दिवस बिबि हाऊसमध्ये होतो. जवळपास दोन वर्ष झाली या गोष्टीला, परंतु मी बिग बॉसच्या घराला खूप मीस करतोय. खूप छान प्रवास होता. त्या घराची एक जादू म्हणजे माणसाचं आयुष्य बदलून जातं. मी स्वतःला नव्याने भेटलो. बि बि हाऊसचं लोकेशन फिल्म सिटीला होतं. त्यामुळे त्या फिल्म सिटीतील सेटवरच्या खूप आठवणी आहेत. माझ्या अनेक मालिकांचे सेटस तिथे होते. त्यामुळे ती जागा माझ्यासाठी लकी आहे."

पुढे तो बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वातील स्पर्धकांविषयी सांगतो, "आता जे ८ कंटेस्टंट राहिलेत ते सगळेच स्ट्रॉंग स्पर्धक आहेत. ते खूप जिद्दीने खेळत आहेत. विशाल निकमचं सांगायचं झालं तर तो समोरच्या टीमशी न भांडता स्वताच्याच टीमशी जास्त भांडतो. आणि त्यामुळे तो कुठेतरी मागे पडतोय. विकास पाटिल हा मास्टर माइंड वाटतो. आणि तो माझ्यामते टॉप ३ मध्ये असेल. मीनल शहा मला खूप लॉयल वाटते. सोनाली पाटिल म्हणजे कोल्हापुरी ठसका. तिला जर तीची मत योग्यरीत्या मांडता आली तर तिचा पुढिल प्रवास सोप्पा होईल."

पुढे तो सांगतो, "मीरा पहिल्या दिवसापासून मनोरंजन करते पण असं वाटतं ती टॉप ५ पर्यंत जाईल. जय दुधाणेबद्दल सांगायचं तर तो रिॲलीटी शो करून आलाय त्यामुळे त्याला माहिती आहे टास्क कसं खेळतात. परंतु लोकांना त्याचा स्वभाव रागिष्ट वाटतो. फक्त त्याने त्याच्या रागावर कंट्रोल केलं तर तो पुढे जाईल. उत्कर्ष शिंदे मला टॉप ५ मध्ये असेल अस वाटतं. गायत्रीला या आठवड्यात हाताला लागलं असल्यामुळे तिला फिजीकली खेळता येत नाही आहे. आता बिग बॉसच्या घरात काय नविन खेळ होत आहेत हे पाहाणं औत्सुक्याचं ठरेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT