hawahawai marathi sakal
मनोरंजन

हवाहवाई" चित्रपटात स्ट्रीट फूड विक्रेत्यांबददल जो आदर व्यक्त केलाय तो खरोखरच अविस्मरणीय

आपला छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या महिलेची संघर्षकथा मांडणाऱ्या 'हवाहवाई' या चित्रपटाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त पसंती मिळत आहे

- अरुण सुर्वे

हवाहवाई : आपला छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या महिलेची संघर्षकथा मांडणाऱ्या 'हवाहवाई' या चित्रपटाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त पसंती मिळत आहे. अत्यंत प्रेरणादायी अशी कथा चित्रपटातून मांडण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, मराठीत पदार्पण केलेल्या निमिषा सजयन या मल्याळम अभिनेत्रीच्या अभिनयाचंही कौतुक होत आहे.

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी 'हवाहवाई' चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. अभिनेत्री निमिषा सजयनसह वर्षा उसगावकर, संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. तर पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उर्मिला धनगर यांनी या चित्रपटासाठी गाणी गायली आहेत.

काय आहे कथा?

आपल्या आजुबाजूला अनेक महिला फूडस्टॉल चालवताना दिसतात. मात्र, त्यामागे त्यांचा काय संघर्ष असतो हे अनेकदा माहीत नसतं. अशाच एका फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलेची कथा 'हवाहवाई' या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. अडचणीच्या परिस्थितीत खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या कुटुंबाला सावरण्याचं काम महिला करत असतात. त्यासाठी त्या विरोधाला तोंड देतात, वाटेल तितके कष्ट करतात. असाच एक अनोखा संघर्ष 'हवाहवाई' हा चित्रपट मांडत असल्यानं त्यातून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे. बऱ्याच काळानंतर अत्यंत प्रेरणादायी गोष्ट मराठी चित्रपटातून मांडली गेली आहे. चित्रपट पाहताना डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहात नाही, अशा अनेक भावनिक प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. राज्यभरातून 'हवाहवाई' चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे.

का पहावा हवाहवाई चित्रपट?

मराठीत म्हणं आहे, 'घरोघरी मातीच्या चुली'. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट येत असतात अन त्यावर मात करून जो पुढे जातो, तो यशस्वी होतो. अशीच सर्वसामान्य कुटुंबातील कथा "हवाहवाई" या चित्रपटात निर्माते- दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी मांडली आहे. त्यात निमिषा सजयनचा अभिनय अप्रतिम आहे. मल्याळम अभिनेत्रीला मराठीत ब्रेक देवून एक नवी उंची महेश टिळेकर यांनी गाठली आहे. वर्षा उसगावकर यांनी केलेला अभिनय लाजबाब आहे. प्राजक्ता हनमघर हिची धमाल लक्षात राहणारी आहे. सिद्धार्थ जाधव याची छोटीशी भूमिका असली तरी ती स्मरणात राहणारी आहे. किशोरी गोडबोले, मोहन जोशी, स्मिता जयकर, बिपीन सुर्वे यांच्या भूमिका दमदार आहेत.

ज्यावेळी "वन रूम कीचन" हा महेश टिळेकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि कॉमन मॅनच्या आयुष्यातील चित्रपट काढला, तेव्हा प्रेक्षक भारावून गेले होते. जणू त्यांना ही कथा आपलीच वाटत होती. "हवाहवाई" चित्रपट पाहून स्ट्रीट फूड विक्रेत्यांबददल जो आदर व्यक्त केलाय, तो खरोखरच अविस्मरणीय आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो. स्वाभिमान असतो. त्यानुसार आपण जगायचं असतं. ज्यावेळी आपण हा चित्रपट प्रत्यक्षात चित्रपटगृहात जाऊन पहाल, त्यावेळी चार ते पाच वेळेस आपले डोळे पानावल्याशिवाय राहणार नाही. कारण, त्यासाठी पात्रांमध्ये जान उतरावी लागते अन ही किमया महेश टिळेकर यांनी बरोबर उतरवली आहे. यात आशाताई भोसले व उर्मिला धनगर यांनी गायलेली गाणी खरोखरच स्फूर्ती देणारी आहेत. सर्वांनाच आपलंसं करणारा हा चित्रपट आहे. यात आपलेपण आहे. सर्वसामान्यांच्या भावना आहेत. जिदद अन चिकाटी आहे. स्त्रीच्या सामर्थ्याच अस्तित्व आहे. म्हणूनच या चित्रपटाचा दुसरा भाग यावा, ही इच्छा प्रेक्षकांन व्यक्त केली आहे.

हवाहवाई' चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद आनंददायी आणि भारावून टाकणारा आहे. एक अनोखी संघर्षकथा हवाहवाईतून मांडण्याचा, महिलांच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे. आता प्रेक्षकांकडूुन मिळत असलेल्या प्रतिसादामुळे या प्रयत्नांचं चीज झाल्यासारखं वाटतं.

- महेश टिळेकर,लेखक, दिग्दर्शक, निर्माता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT