shah rukh khan Sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: फ्रेंचलाही लागलं बादशाहचं वेड! फ्रेंच राजदूताने शेअर केला शाहरुख खानसोबतचा फोटो, म्हणाला- 'इकडे येऊन पुन्हा'

शाहरुखने 4 वर्षांनंतर पठाणच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे, आजपर्यंत कोणत्याही बॉलीवूड स्टारला अशी कामगिरी करता आलेली नाही.

Aishwarya Musale

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा जलवा देश-विदेशात गल्लीबोळात प्रसिद्ध आहे. शाहरुखचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. शाहरुखच्या पठाण चित्रपटाला मिळालेल्या प्रेमानंतर सुपरस्टारच्या चाहत्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. शाहरुखने 4 वर्षांनंतर पठाणच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे, आजपर्यंत कोणत्याही बॉलीवूड स्टारला अशी कामगिरी करता आलेली नाही.

अलीकडेच शाहरुख खान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब NMACC च्या लॉन्चिंगला उपस्थित होते. शाहरुख अंबानी कुटुंबाच्या खूप जवळचा आहे. शाहरुख अनेकदा अंबानी कुटुंबाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये दिसतो.

अशा परिस्थितीत NMACC कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही शाहरुख खानचा स्वॅग पाहायला मिळाला. कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी शाहरुख खानने आपल्या खास पद्धतीने शोमध्ये परफॉर्म केला. स्टारसोबत फोटो क्लिक करण्याच्या इच्छेने प्रत्येकजण तिथे उभा होता.

दरम्यान, शाहरुख खानच्या चाहत्यांच्या यादीत फ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनन यांचेही नाव आहे. इमॅन्युएल लेनेनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शाहरुख खानसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याने शाहरुखला फ्रान्समध्ये परत येण्यासाठी आणि पुन्हा शूट करण्यासाठी सांगितले आहे. शाहरुख खानसोबत फ्रान्सच्या राजदूताला पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

पठाण स्टारसोबतचा फोटो शेअर करताना राजदूताने ट्विट केले की, मुंबईत शाहरुख खानसोबतची त्यांची भेट खास होती. त्याने शाहरुख खानला फ्रान्समध्ये येऊन पुन्हा शूटिंग करण्यास सांगितले. त्याने सांगितले की फ्रान्सचे लोक त्याच्यावर किती प्रेम करतात, त्यांना शाहरुखला आणि बॉलीवूडला आणखी पाहायचे आहे.

2014 मध्ये शाहरुखला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार शाहरुख खानला फ्रान्सचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री लॉरेंट फॅबियस यांनी स्वतःच्या हाताने दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT