Matthew Perry died from 'acute effects of ketamine'  sakal
मनोरंजन

Matthew Perry: तब्बल दिड महिन्यानंतर अभिनेता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं गूढ उकललं! 'या' गोळीने घेतला जीव!

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीच्या निधनाचे कारण समोर आले आहे.

Vaishali Patil

Matthew Perry died from 'acute effects of ketamine: नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील चँडलरची भूमिका करणारा मॅथ्यू पेरीचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. मॅथ्यू पेरीचा वयाच्या ५४ व्या वर्षी मृत्यू झाल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.

अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह राहत्या घरी आढळला. मॅथ्यूचा मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत सापडल्याने त्याच्या मृत्युचं नेमकं कारण याबाबत अनेक चर्चा होत्या.

आता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूशी संबंधित वैद्यकीय अहवाल शुक्रवारी समोर आला आहे. यात मॅथ्यूच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. केटामाईनच्या ओव्हर डोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लॉस एंजेलिसच्या काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने त्याच्या मृत्यूचे कारण बुडणे, कोरोनरी धमनी रोग आणि अपघात म्हणून नोंद केले आहे. त्याच्या मृत्यूच्या आधीच्या तपासात घटनास्थळी कोणतेही ड्रग्स आढळले नाहीत, परंतु त्याच्या घरी प्रिस्क्रिप्शन औषधे सापडली आहेत.

रिपोर्टनुसार, पेरीच्या रक्तातील केटामाइनची पातळी जास्त होती. केटामाइन हे शस्त्रक्रियेमध्ये भूल देण्यासाठी वापरलं जाते. त्याच्या अती सेवनाने पेरीच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढला आणि तो बेशुद्ध झाला, त्यानंतर पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

फ्रेंड्स'मधून मिळाली प्रसिद्धी

मॅथ्यूज 'बेव्हरली हिल्स 90210' आणि 'अ नाइट इन द लाइफ ऑफ जिमी रीअर्डन' मध्ये देखील दिसला होता. पण त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती टीव्ही सिटकॉम 'फ्रेंड्स'मधून.

ही मालिका 22 सप्टेंबर 1994 रोजी सुरू झाली आणि 6 मे 2004 रोजी संपली. या काळात 236 भागांसह 'फ्रेंड्स'चे दहा सीझन आले.

त्याने फुल्स रश इन, ऑलमोस्ट हीरोज, द होल नाइन यार्ड्स, 17 अगेन आणि द रॉन क्लार्क स्टोरी यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT