Matthew Perry Passed Away Esakal
मनोरंजन

Matthew Perry Passed Away: 'फ्रेंड्स'मधील 'चँडलर बिंग' कालवश! अभिनेता मॅथ्यू पेरीचं निधन, राहत्या घरी आढळला मृतदेह

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन झाले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील चँडलरची भूमिका करणारा अभिनेता मॅथ्यू पेरीचे निधन झाले आहे. अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला. मॅथ्यूचा मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत सापडला आहे. मात्र मृत्युचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (Latest Marathi News)

मॅथ्यू पेरीने वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. लास वेगास येथील राहत्या घरी अभिनेत्याचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. 'फ्रेंड्स' या लोकप्रिय मालिकेमधून मॅथ्यू पेरीचे घराघरांत चाहते झाले. अभिनेत्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शोक व्यक्त करत आहेत.

कोण आहे मॅथ्यू पेरी?

मॅथ्यू पेरी हा अभिनेता जॉन बेनेट पेरी आणि कॅनडाचे पंतप्रधान पियरे ट्रूडो यांचे एकेकाळचे प्रेस सेक्रेटरी सुझान मेरी लँगफोर्ड यांचा मुलगा आहे. त्यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६९ रोजी विल्यमस्टाउन येथे झाला. जेव्हा पेरी 1 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. 'चार्ल्स इन चार्ज' या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. (Marathi Tajya Batmya)

फ्रेंड्स'मधून मिळाली प्रसिद्धी

मॅथ्यूज 'बेव्हरली हिल्स 90210' आणि 'अ नाइट इन द लाइफ ऑफ जिमी रीअर्डन' मध्ये देखील दिसला. पण त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती टीव्ही सिटकॉम 'फ्रेंड्स'मधून. ही मालिका 22 सप्टेंबर 1994 रोजी सुरू झाली आणि 6 मे 2004 रोजी संपली. या काळात 236 भागांसह 'फ्रेंड्स'चे दहा सीझन आले. त्याने फुल्स रश इन, ऑलमोस्ट हीरोज, द होल नाइन यार्ड्स, 17 अगेन आणि द रॉन क्लार्क स्टोरी यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT