Friendship Day 2023 Sanjay Dutt Arshad Warsi  esakal
मनोरंजन

Sanjay Dutt Arshad Warsi Friendship : 'तिच्याकडे पाहू नकोस, तुझी वहिनी आहे ती!' संजूबाबानं बरोबर पकडलं

अर्शद आणि संजय दत्तनं मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये एकत्र काम केले होते.

युगंधर ताजणे

Friendship Day 2023 Sanjay Dutt Arshad Warsi : फ्रेंडशिप डे च्यानिमित्तानं बॉलीवूडमधील त्या दोन प्रसिद्ध मित्रांची चर्चा होणार नाही असे होऊ शकत नाही. बॉलीवूडचा बाबा संजय दत्त आणि अर्शद वारसी या दोन अभिनेत्यांमधील मैत्री ही नेहमीच अनेकांच्या चर्चेचा विषय राहिली आहे. अर्शद आणि संजय दत्तनं मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये एकत्र काम केले होते. त्या चित्रपटानं दोन्ही सेलिब्रेटींमधील मैत्री अधिक गहिरी झाली.

कदाचित तो किस्सा आता संजयला देखील लक्षात राहिला नसेल. जेव्हा मी त्याला पहिल्यांदा १९८१ मध्ये भेटलो होतो. त्यावेळी त्याचा रॉकी नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मी तेव्हा नाईट क्लबमध्ये जात असे. तिथं संजू देखील यायचा. एकदा तिथे रिचा शर्मा आली होती. आणि आम्ही सगळे तिला पाहत होतो. ती खूपच सुंदर होती. तेव्हा संजूनं आम्हाला नोटीस केले होते. तो म्हणाला, अरे ती तुझी होणारी वहिनी आहे. मला काय बोलावं हेच कळेना.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

रिचानं नंतर संजय दत्तसोबत लग्नही केलं होतं. लग्नापूर्वी त्यांनी एकमेकांना काही वर्षे डेटही केले होते. रिचा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिचा १९९६ मध्ये मृत्यू झाला. अर्शदच्या त्या आठवणीनंतर संजूबाबानं देखील त्याच्याविषयी काही किस्से यावेळी शेयर केले होते. मला वाटतं मुन्नाभाई एमबीबीएस नंतर माझ्यातील आणि अर्शदमधील बॉडिंग आणखी चांगले झाले. तो मला मित्र नव्हे तर लहान भावासारखाच आहे. तो खूप संवेदनशील माणूस आहे. असे संजूनं अर्शदविषयी सांगितले.

अर्शद वारसीनं सांगितलं की, माझी आणि संजय दत्तची बॉडिंग ही फार वेगळी आहे. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. पण काही गोष्टींबाबत आमच्यात कटाक्षानं पाळल्या जातात. एकमेकांचा आदर, कामाप्रती निष्ठा, विश्वास आणि संवाद या मैत्रीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची काळजी आम्ही आतापर्यत घेतली आहे.यापुढे देखील त्याचे पालन केले जाईल.

तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्यात आणि संजय दत्तमध्ये असणारं नातं हे फार घनिष्ठ आहे. मला मदत करण्यासाठी दत्त फॅमिली नेहमीच अग्रेसर असते. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले की माझ्यासाठी संजय दत्त उभा राहिला. म्हणून मला त्याचा नेहमीच आदर वाटत आला आहे. तो कलाकार म्हणून तर ग्रेट आहेच याशिवाय माणूस म्हणूनही तुम्ही त्याचा आदर केल्याशिवाय राहणार नाही. अशी प्रतिक्रिया अर्शदनं यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT