Friendship Day 2023 Shiv Thakare Daisy Shah  esakal
मनोरंजन

Friendship Day Special : डान्सच्या निमित्तानं एकत्र आले, झालं 'झिंग झिंग झिंगाट!' शिव अन् डेझीची हटके फ्रेंडशिप माहितीये?

मनोरंजन क्षेत्रातील काही सेलिब्रेटींच्या मैत्रीच्या गोष्टी या नेहमीच प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे.

युगंधर ताजणे

Friendship Day 2023 Shiv Thakare Daisy Shah : मैत्री आयुष्यातलं एक असं नातं जे पुढे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर साथ करतं. खूप काही देऊन जातं. त्याच नात्याच्या जोरावर आपली जीवनप्रवास हा सुखकर होऊन जातो. आय़ुष्यात मैत्रीचं पान सांभाळून ठेवत त्यावर मनापासून प्रेम करत नव्या वाटांचा शोध घेणे त्या मैत्रीमुळे शक्य होऊन जाते.

मनोरंजन क्षेत्रातील काही सेलिब्रेटींच्या मैत्रीच्या गोष्टी या नेहमीच प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. त्याची चर्चा होत असते. बॉलीवूडमधील आयडियल फ्रेंडशिप जोड्याही आपल्याला माहिती आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अशाच एका कपल्सविषयी आजच्या फ्रेंडशिप डे च्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत. ती जोडी आहे शिव ठाकरे आणि डेझी शाहची.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सोशल मीडियावर शिव ठाकरे अन् डेझी शाह हे सेलिब्रेटी नेहमीच चर्चेत असतात. बिग बॉसमधून शिवनं अमाप लोकप्रियता मिळवली. तो विजेता व्हावा अशी त्याच्या लाखो फॅन्सची इच्छा होती. पण ते झालं नाही. त्याच्याऐवजी एमसी स्टॅन हा विजेता झाला होता. त्यावेळी एमसी स्टॅन आणि शिवच्या मैत्रीच्या गोष्टी तुफान व्हायरल झाल्या होत्या. शिवनं देखील मनाचा मोठेपणा दाखवत स्टॅनला शुभेच्छा दिल्या होत्या.

शिव अन् डेझीची मैत्री ही नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. त्यांच्या मैत्रीची मनोरंजन विश्वात कायमच चर्चा होते. सोशल मीडियावर दोघांचे व्हायरल होणारे व्हिडिओ, फोटो यामुळे ती मैत्री खास राहिली आहे. शिव आणि डेझी या दोघांची ओळख खतरो के खिलाडी १३ च्या सेटवर सगळ्यात पहिल्यांदा भेट झाली होती. शिवनं दैनिक जागरणला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या अन् डेझीच्या मैत्रीविषयी सांगितलं आहे.

आमची मैत्री ही खूपच नितळ आहे. आम्ही एकमेकांना नेहमीच समजून घेतले आहे. ते नातं फारचं प्रेमळ आहे. चांगला संवाद आहे. त्यामुळे कधीही गैरसमज होत नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आम्ही एकमेकांमधील विश्वास जपला आहे. त्याला तडा जाऊ दिलेला नाही. खतरो के खिलाडीच्या निमित्तानं आम्ही एकत्र आलो. त्यानंतर मैत्रीच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली.

खतरो के खिलाडी परफॉर्मन्स करताना आम्ही खूप थकून जायचो. एकदा आमच्या दोघांचा परफॉर्मन्स संपला आणि आम्ही पुन्हा हॉटेलकडे निघालो होतो तेव्हा बसमध्ये एक गाणे सुरु होते. आम्ही कसलाही विचार न करता डान्सला सुरुवात केली. तो प्रसंग खूपच संस्मरणीय होता. त्यानंतर आम्ही एकत्र रिल्स तयार करणे, शॉपिंगला एकत्रित जाऊ लागलो. त्या आठवणी खूपच छान आहेत. अशा शब्दांत शिवनं त्याच्या अन् डेझीच्या आठवणींना उजाळा दिला.

आमच्यात खूप छान ट्युनिंग आहे. संवाद आहे. शॉपिंग करताना मी तर नेहमीच गोंधळून जायचो. पण तेव्हा डेझीनं मला छान सांभाळून घेतलं. ते महत्वाचे होते. मैत्रीमध्ये एकमेकांना नकळत सांभाळून घेणे आणि संवाद साधत राहणे महत्वाचे आहे. आमच्यात ती गोष्ट होत होती. यामुळे ते नातं आणखी बहरत गेलं. असेही शिवनं त्या मुलाखतीमध्ये सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्णधार पृथ्वी शॉ फेल, महाराष्ट्राच्या संघाला १५४ धावांचा पाठलागही जमेना! SMAT 2025 स्पर्धेत तिसरा पराभव

Crime: एक भीती अन् वडिलांची असहाय्यता... पित्यानं लेकीला अंधाऱ्या खोलीत २० वर्ष कैद केलं, हादरवणारं कारण समोर

Sangli Water Crisis : अशुद्ध पाण्याने किल्लेमच्छिंडगडचे नागरीक त्रस्त; किडनी स्टोनचा धोका वाढतोय!

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update: कंटेनर-दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT