Fukrey 3 Vs The Vaccine War Vs Chandramukhi 2Box Office Collection Day 3 Esakal
मनोरंजन

BO Collection Day 3: चुचा - हनीचा जुगाड यशस्वी! फुक्रे 3 ने वीकेंडला जमवले इतके कोटी! 'द वॅक्सीन वॉर' अन् 'चंद्रमुखी 2' ला धोबीपछाड

Vaishali Patil

सध्या बॉक्स ऑफिसवर तीन सिनेमे एकमेकांना टक्कर देत आहे. 'फुक्रे 3', 'द वॅक्सीन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' हे सिनेमे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

यात आता 'फुक्रे 3' लोकांची मने जिंकत आहे. प्रेक्षकांना मनोरंजनाचा तडका जास्त आवडत आहे. 'फुक्रे 3', 'द वॅक्सीन वॉर' आणि 'चंद्रमुखी 2' यांच्या टक्करमध्ये फुक्रेने पुन्हा बाजी मारली आहे. 'फुक्रे 3' तिसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे.

'फुक्रे 3' च्या कमाईच्या आकड्यावर नजर मारली तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8.82 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी 7.81 कोटींची कमाई केली होती. तर आता Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 'फुक्रे 3' ने तिसऱ्या दिवशी 11.30 कोटींचा व्यवसाय केला आहे. या तिनही दिवसांचे कलेक्शन लक्षात घेता चित्रपटाने एकूण 27.93 कोटींची कमाई केली आहे.

२८ सप्टेंबरला 'फुक्रे ३' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रिचा चढ्ढा, पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी आणि मनजोत सिंग यांच्या मुख्य भूमिका या कॉमेडी ड्रामा चित्रपटात आहेत.

हा चित्रपट फुक्रे रिटर्न्सचा अधिकृत सिक्वेल आणि फुक्रे फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित आणि फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मिती केली आहे.

तर दुसरीकडे विवेक अग्नीहोत्रींच्या 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाने पहिल्या दिवशी 0.85 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी फक्त 0.9 लाखांची कमाई केली होती तर आता तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने केवळ 1.50 कोटींची कमाई केली आहे. तर

राघव लॉरेन्स आणि कंगना राणौतच्या साऊथ हॉरर कॉमेडी चित्रपट 'चंद्रमुखी 2' ने पहिल्या दिवशी 7.5 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 4.50 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 5 करोड रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT