Oscars 2023 best actor, actress and movie SAKAL
मनोरंजन

Oscars 2023: कोण ठरलं सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री आणि सिनेमा.. ऑस्कर विषयी सविस्तर एका क्लिकवर

आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडला

Devendra Jadhav

Oscars 2023 News: आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडला. जगभरातल्या नामांकित कलाकृती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन लिस्ट मध्ये आहेत. या सर्व कलाकृतींमध्ये भारतीय सिनेमा RRR सुद्धा समाविष्ट आहे.

RRR ला मधील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरी मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय बेस्ट पिक्चर, अभिनेता, अभिनेत्री ऑस्कर कोणाला मिळालाय पाहूया

बेस्ट पिक्चर :

ऑस्कर २०२३ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात Everything Everywhere All at Once हा सिनेमा बेस्ट पिक्चर ठरला आहे. सिनेमाच्या सर्व टीमने आनंद साजरा केला

बेस्ट अभिनेत्री :

ऑस्कर २०२३ पुरस्कार सुरु आहेत. यात बेस्ट अभिनेत्री कॅटेगरीत Michelle Yeoh या अभिनेत्रीला Everything Everywhere All at Once सिनेमासाठी बेस्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर मिळाला आहे

बेस्ट अभिनेता :

ऑस्कर २०२३ पुरस्कार सुरु आहेत. यात बेस्ट अभिनेता कॅटेगरीत Brendan Fraser या अभिनेत्याला त्याच्या The Whale सिनेमासाठी Best Actor म्हणून गौरवण्यात आले

भारतीय शॉर्ट फिल्मने पटकावला ऑस्कर :

The Elephant Whisperers या ४१ मिनिटाच्या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार पटकावला. भारतीयांच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा रोवला गेलाय.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:

Everything Everywhere All at Once सिनेमासाठी Daniel Kwan आणि Daniel Scheinert या दोघांना बेस्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला.

बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले :

Everything Everywhere All at Once या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले या श्रेणीत Daniel Kwan आणि Daniel Scheinert यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

बेस्ट VFX:

काहीच दिवसांपुर्वी भारतात रिलीज झालेल्या अवतार 2 सिनेमाने Best Visual effects पुरस्कार पटकावला आहे. अवतार 2 भारतात सुपरहिट झाला. अनेकांनी सिनेमातल्या VFX चं कौतुक केलं. आता अवतार 2 ने बेस्ट Visual effects चा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

बेस्ट साऊंड :

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ च्या Top Gun: Maverick सिनेमाला बेस्ट साउंडचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म:

सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म या ऑस्कर श्रेणीत 'An Irish Goodbye' या शॉर्ट फिल्मला पुरस्कार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT