Gadar 2 After Sunny Ready to work in Border 2 esakal
मनोरंजन

Border 2 : 'बॉर्डर २ येणार का?' सनीनं दिली मोठी प्रतिक्रिया! 'मला अजूनही...'

गेल्या काही दिवसांपासून सनी देओलच्या गदर २ नंतर बॉर्डर चित्रपटावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

Gadar 2 After Sunny Ready to work in Border 2 : सनीच्या गदर २ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २२ वर्षांनी आलेल्या गदर २ नंतर आता सनी पुन्हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तो बॉर्डर २ मध्ये देखील दिसणार असल्याची चर्चा आहे. ही चर्चा एवढी वाढली आहे की त्यावर अखेर सनीला खुलासा करावा लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सनी देओलच्या गदर २ नंतर बॉर्डर चित्रपटावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचे दिसून आले. त्यावर सातत्यानं होणाऱ्या चर्चा पाहून सनीनं प्रतिक्रिया दिली आहे. त्या प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. गदर २ च्या भव्य यशानंतर आता बॉर्डर २ येणार असे बोलले जाऊ लागले होते.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

मीडिया रिपोर्टनुसार बॉर्डर २ हा १९७१ च्या भारत -पाकिस्तान युद्धावर आधारित असणार अशी जोरदार चर्चा आहे. याशिवाय या सिक्वेलचे दिग्दर्शन जेपी दत्ता आणि त्यांची मुलगी निधी दत्ता दिग्दर्शित करणार असल्याची चर्चा आहे. मेकर्सनं या चित्रपटामध्ये सनीला कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही नवोदित कलाकारांना देखील या चित्रपटामध्ये संधी दिली आहे.

यासगळ्यावर सनीनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, माझ्याकडे बॉर्डर २ विषयी अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मला त्याविषयी काहीही माहिती नाही. सनीनं सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली आहे. त्यात त्यानं या गोष्टींचा उल्लेख केला आहे. काही बातम्या ऐकायला येत आहे की, मी काही फिल्म साईन केल्या आहेत. त्यात बॉर्डर २ नावाचा उल्लेख आहे. पण माझे लक्ष सध्या हे गदर २ वर आहे. असेही सनीनं सांगितले.

गदर २ विषयी सांगायचे झाल्यास या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे. तो वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर करताना दिसतो आहे. सनी देओलच्या गदर च्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. त्यानंतर २२ वर्षांनी त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांनी त्याचे आनंदानं स्वागत केले आहे.

गदर २ मधून सनीनं दमदार कमबॅक केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची वाट पाहत होते. गदर २ मधून सनीनं पुन्हा एकदा आपण किती मोठ्या ताकदीचे अभिनेते आहोत हे दाखवून दिले आहे. गदर २ ची सोशल मीडियावर देखील खूपच चर्चा आहे. सध्या बॉलीवूडच्या चित्रपटांनी मोठी क्रेझ तयार केली आहे. यापूर्वी रणवीर आलियाच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सनीच्या गदर २ ला आता ऑल टाईम बेस्ट मुव्ही म्हणून प्रेक्षकांनी घोषित करुन टाकले आहे. सनीनं आपल्या साऱ्या यशाचे श्रेय प्रेक्षकांना आणि त्याच्या सुनेला दिले आहे. सनीचे म्हणणे आहे की, सुनबाई घरात आल्यानंतर आम्हाला गोड बातमी मिळाली, गदरला मिळालेलं यश हा तिचा पायगुण आहे. अशी प्रतिक्रिया सनीनं एका मुलाखतीमध्ये दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT