Gadar 2 Box Office Collection Day 10: Esakal
मनोरंजन

Gadar 2 Box Office Collection Day 10: आता 'गदर2' शाहरुखच्या 'पठाण'वर भारी पडणार! दहाव्या दिवशीही कमाईत घट नाहीच

Vaishali Patil

Gadar 2 Box Office Collection Day 10: 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये सनी देओलचा गदर 2 सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशी बंपर ओपनिंग करत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 40 कोटींचा गल्ला जमवला होता.

यासोबतच गदर 2 हा वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या आणि सनी देओलच्या अॅक्शनने भरलेल्या या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले असले तरी कमाईचा आलेख वाढतच जात आहे.

सुरुवातीच्या वीकेंडमध्ये म्हणजेच तीन दिवसांत चित्रपटाने 134.88 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसऱ्या विकेंडला गदर 2 ने शुक्रवारी देशभरात 20 कोटींहून अधिक कलेक्शन केले तर शनिवारी हे कलेक्शन 31.07 पर्यंत वाढले.

आता 10 व्या दिवशी म्हणजेच रविवारी, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, गदर 2 ने 38.90 कोटींची कमाई करत 350 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर चित्रपटाची एकूण कमाई 377 कोटींवर गेली आहे.

पठाणनंतर हा चित्रपट वर्षभरातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. आता गदर 2 लवकरच बॉक्स ऑफिसवर 500 कोटींची कमाई करेल यात काही शंकाच नाही.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत इंस्टाग्रामवर लिहिले एक पोस्ट शेयर केला आहे. ज्यात त्याने 'गदर 2' ने कसा नवा रेकॉर्ड तयार केला आहे हे सांगितले आहे. Gadar2 ने दुसऱ्या विकेंडला सर्वात जास्त कमाई करत पठाण, बाहूबली आणि KGF2 चा रेकॉर्ड मोडला आहे.

गदर 2 हा सनी देओलच्या 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वेल आहे. ज्यात सनी देओलसोबत अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, मनीष वाधवा आणि सिमरत कौर महत्वाच्या भुमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagarparishad Reservation 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण जाहीर! राज्यातील ६७ नगरपरिषदा ओबीसीसाठी, तर २३ एसी-एसटीसाठी राखीव, ओबीसी महिलांना किती?

CJI B. R.Gavai : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश बी.आर गवई यांच्यावर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, आरोपी म्हणाला, सनातन धर्म जर...

Supriya Sule Video: आमच्या सिरियलवर तोडगा काढा, पैसे वाया जातात; पुणेरी आजीबाईंचा प्रश्न- सुप्रिया सुळेंना उत्तर सुचेना

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

SCROLL FOR NEXT