Director Anil Sharma plans to send Gadar 2 for the Oscars: Esakal
मनोरंजन

Gadar 2: सनी पाजीचा 'गदर 2' आता थेट ऑस्करला जाणार? दिग्दर्शक अनिल शर्मांचा दावा..

अनिल शर्मा दिग्दर्शित सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर गदर 2 या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतांना दिसत आहे.

Vaishali Patil

Director Anil Sharma plans to send Gadar 2 for the Oscars: गदर 2 हा सिनेमा रिलिज होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी या चित्रपटाची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. या सिनेमाने आत्तापर्यंत कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. गदर 2 हा या वर्षीचा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट झाला आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर गदर 2 या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या चित्रपटाची टिम टित्रपटाच्या यशाचा आनंद घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गदर 2 बद्दल काही दावे केले आहे.

सनी देओल गदर 2 च्या प्रचंड यशाचा आनंद घेत आहे. आतापर्यंत, हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पुढील वर्षी हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार असल्याचे अनिल शर्मा यांनी सांगितले.

याबद्दल बोलताना ते म्हणाले की, " हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात यावा यासाठी लोक मला वारंवार फोन करत आहेत. गदर: एक प्रेम कथा हा सिनेमा त्यावेळी चालला नाही , त्यामुळे गदर 2 कसं काम करेल हे मला माहीत नाही, मात्र आम्ही ते करतोय ."

'गदर 2' ऑस्करला जाणार का, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर दिग्दर्शक म्हणाले की, "गदर 2 सिनेमा ऑस्करसाठी गेला पाहिजे, चित्रपट त्यासाठी पात्र आहे. गदरही यासाठी पात्रच होता. गदर हा चित्रपट 1947 च्या फाळणीवर आधारित होता. त्याची कथा अगदी वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली होती. ही एक नवीन आणि मूळ कथा होती आणि गदर 2 देखील नवीन आणि ओरिजनल कथा आहे."

पुरस्कारबद्दल बोलताना दिग्दर्शकांनी सांगितले की, "असे वाटते की मी अजिबात काम केलेले नाही. मला माहित नाही की पुरस्कार मिळेल की नाही. कोणी आम्हाला पुरस्कार देत नाही. गदर 2 द्वारे आम्ही प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.

मात्र मी खोटं बोलणार नाही. आम्हाला पुरस्कारही हवे आहेत. मी ऐकलं आहे की या गोष्टींमध्ये बरच लॉबिंग आणि पीआर गुंतलेले असतात. मी राजकीय व्यक्ती नाही. मी कधीही पुरस्कारांसाठी लॉबिंग केलेले नाही.

त्यामुळे मला कोणताही पुरस्कार मिळणार नाही. त्यामुळे आता त्यांनी काही धक्कादायक खुलासा करत अनेक दावे केले आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT