gadar 2 fame Ameesha Patel makes serious allegations against the director producer anil sharma SAKAL
मनोरंजन

Gadar 2: सकीना फेम अमिषा पटेलचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, रिलीजपुर्वीच सिनेमा अडचणीत Amisha Patel

अभिनेत्री अमिशा पटेलने सिनेमाच्या मेकर्सवर गंभीर आरोप केले आहेत.

Devendra Jadhav

Gadar 2 Amisha Patel News: गदर २ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सनी देओल आणि अमिषा पटेलचा गदर पाहण्याची सर्वांना उत्सुकता आहे. चित्रपटाचा सिक्वेल 'गदर २' ची घोषणा झाल्यापासूनच चाहते या चित्रपटाची वाट बघत आहेत.

अशातच हा सिनेमा रिलीजआधीच अडचणीत सापडला आहे. सिनेमातील सकीना म्हणजेच अभिनेत्री अमिशा पटेलने सिनेमाच्या मेकर्सवर गंभीर आरोप केले आहेत.

(gadar 2 fame Amisha Patel makes serious allegations against the director producer anil sharma)

कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही

खरं तर, अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर मे महिन्यात चंदीगडमध्ये गदर 2 च्या शेवटच्या शेड्यूलच्या शूटिंगदरम्यान आलेल्या काही समस्यांचा उल्लेख केला आहे.

अमिषाने ट्विट केले की, "चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या प्रॉडक्शन हाऊसने हाताळली होती, परंतु प्रॉडक्शन हाऊसने मेकअप आर्टिस्टपासून कॉस्च्युम डिझायनर्सपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही आणि त्यांना चित्रपटाबद्दल माहितीही नाही."

गाडी नाही आणि मोठी गैरसोय

अमिषाने पुढे लिहिले की, पगाराव्यतिरिक्त या सर्वांची राहण्याची सोय, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी चंदीगड एअरपोर्टपर्यंत प्रवास, त्यांचे जेवणाचे बिल दिलेले नाही.

तसेच, काही कलाकार आणि क्रू मेंबर्सना गाडीही देण्यात आली नाही, त्यामुळे ते अडकून पडले.

पण अनिल शर्मा यांनी निर्माण केलेल्या या समस्या झी स्टुडिओने सोडवल्या. यानंतर अमिषा पटेलने आणखी एक ट्विट केले ज्यामध्ये तिने झी स्टुडिओचे मनापासून आभार मानले.

'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याआधी, 'गदर 2' चित्रपटाशी नवनवीन अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. जे चाहत्यांची उत्सुकता वाढवत असते.

दरम्यान, दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या 'गदर 2' चित्रपटातील 'उड जा काले कावा' गाणही रिलिज करण्यात आलं आहे. हे गाणं प्रेक्षकांना आवडलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT